ETV Bharat / state

भाजपमधील चमच्यांनी वरिष्ठांना चुकीची माहिती दिली; हरिश्चंद्र चव्हाण यांची टीका

author img

By

Published : Mar 30, 2019, 8:39 AM IST

Updated : Mar 30, 2019, 12:59 PM IST

पक्षात काही जणांचे टोळके आहे ते चुकीची माहिती देतात. विरोधात मतदान करावे यासाठी करोडो रुपये मिळत होते. मात्र, मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात निवडणुकीत उभे राहण्यासाठी आग्रह करतात. पण मी कोरड्या विहिरीत उडी मारायची का? असे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यावेळी म्हणाले.

खासदार हरिश्चंद्र चव्हाण

नाशिक - भाजपमध्ये चमचे टोळके कार्यरत आहेत. त्यांनी माझ्याबाबत वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली, अशी अप्रत्यक्ष टीका खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली. जे संकट मोचन म्हणून महाराष्ट्रभर मिरवत आहेत. तेच भविष्यकाळामध्ये मुख्यमंत्र्यांचे संकट होऊ नये याची भिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यापासून सांभाळून राहावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात समर्थकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

खासदार हरिश्चंद्र चव्हाण

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे नाराज झालेले चव्हाण यांच्याकडे भूमिकेकडे लक्ष लागून होते. शुक्रवारी झालेल्या मेळाव्यात त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता तिकीट मिळाले तरी घेणार नसल्याचे ते म्हणाले.

गेल्या निवडणुकीत पवार या पंतप्रधान मोदींना शिव्या घालत होत्या आणि आता त्यांनाच उमेदवारी दिली. पक्षातील अन्य कोणालाही उमेदवारी दिली असती, तर मी काही म्हटले नसते. पक्षात काही जणांचे टोळके आहे ते चुकीची माहिती देतात. विरोधात मतदान करावे यासाठी करोडो रुपये मिळत होते. मात्र, मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात निवडणुकीत उभे राहण्यासाठी आग्रह करतात. पण मी कोरड्या विहिरीत उडी मारायची का? असेही ते यावेळी म्हणाले.

आदिवासींच्या २१ संघटना आमच्यासोबत असून संपूर्ण आदिवासी मतदार हा आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. माकपने नेत्यांशी आमची बोलणी चालू आहे, असे सांगत त्यांनी माकपकडून विधानसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.

Intro:भाजपमध्ये चमचे टोळके कार्यरत असून त्यांनी माझ्याबाबत वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आहे आता टिकीट मिळाले तरी घेणार नाही असे सांगत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारलेले भाजपाचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी पालकमंत्र्यांवर शरसंधान केले जे संकट मोचन म्हणून महाराष्ट्र भर मिरवतात आहे हे भविष्यकाळा मध्ये मुख्यमंत्र्यांचे संकट होऊ नये हि मला भिती आहे तरी मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबत सभाळुन रहावे अस मला वाटते असे बोलुन खा.हरिश्चंद्र चव्हाण यानी नाशिक मधील सुरगाणा तालुक्यात घेण्यात आलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात त्यांनी गिरीश महाजन वर नाव न घेता टिका केली

Body:भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे नाराज झालेले चव्हाण यांच्याकडे भुमीकडे लक्ष लागून होते सुरगाणा येथील समर्थकांच्या मेळाव्यात चव्हाण म्हणाले की गेल्या निवडणुकीत पवार या पंतप्रधान मोदींना शिव्या देत होत्या आणि त्यांनाच उमेदवारी दिली पक्षातील अन्य कोणतेही उमेदवारी दिली असती तर मी काही म्हटले नसते पक्षात काही जणांचे टोळके आहे ते चुकीची माहिती देतात विरोधात मतदान करावे यासाठी करोडो रुपये मिळत होते मात्र मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात निवडणुकी उभे राहण्यासाठी अग्रह करतात पण मी कोरड्या विहिरीत उडी मारायची का? लोकसभा ही लहान नाही मोठी निवडणूक आहे असे कार्यकर्तेना सागितले

Conclusion:आदिवासींच्या 21 संघटना आमच्या सोबत असून संपूर्ण आदिवासी मतदार हा आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत त्यांनी सांगितले की माकपने नेत्यांशी आमची बोलणी चालू आहे असं सांगत दोन दिवसात मी पुढील निर्णय घेऊ असं बोलून हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी मा.प.क.पक्षाकडुन विधानसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहे
Last Updated : Mar 30, 2019, 12:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.