नाशिक - सध्या पितृपक्ष पंधरवाडा सुरु आहे. या पंधरा दिवसात आपल्या पुर्वजांचे श्राध्द घातले जाते. आणि त्यानंतर कावळ्यांना या दिवसात पंचपक्वान्नाचं जेवण खाऊ घातले जाते. सर्व पदार्थांचे ताट करुन घरावर ठेवले जाते. या ताटातले पदार्थ कावळ्याने खाल्ले तरच श्राध्द लागु पडते आणि मगच घरातल्या लोकांनी जेवायचे म्हणून वर्षभर दुर्लक्षित असणाऱ्या कावळ्यांना या दिवसात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवसात कावळ्यांना अन्नाची कमी नसते. प्रत्येक जण या दिवसात कावळ्यांना खायला देतात. मात्र, हा पंधरवाडा संपला की मग पुन्हा कावळ्यांना अन्नाच्या शोधात पोटासाठी भटकंती करावी लागते.
हेही वाचा - 'बॉय विथ ट्रम्प अँड मोदी' : एका फोटोने 'सात्विक'ला केले स्टार
सटाणा तालुक्यातील तळवाडे दिगरचा एक अवलिया आण्णा जगताप वर्षभर आपल्या पितरांना जेऊ घालतात. सर्वसामान्य परिस्थिती असणाऱ्या व चहाचे व पाववड्याची छोटी टपरी टाकुन कसेबसे पोट भरुन आपला उदरनिर्वाह करणारे आण्णा जगताप हे रोज सकाळी आपल्या शेतात जाताना कावळ्यांना खायला जेवण घेऊन जातात. आपल्या पत्नीला रोज राञी जास्त स्वयंपाक करायला लावून उरलेले अन्न दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात घेऊन जाऊन कावळ्यांना खायला देतात.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये गुटखा थुंकणाऱ्या कारचालकामुळे अपघात; तरुणाचा मृत्यू
यामध्ये उरलेले पाववडे, पाव, चपाती, भाकरी, भात रोज सकाळी ते कावळ्यांना खाऊ घालतात. रोज देवपुजेला मळ्यात जाताना कावळ्यांसाठीचे अन्न घेऊन जाण्याचा दिनक्रम आण्णा जगताप यांचा कधी चुकला नाही. माञ, आता तर कावळ्यांना आण्णांचा इतका लळा लागला आहे की, आण्णा शेतात गेल्याबरोबर आण्णांच्या अवती-भोवती कावळे गोळा होतात. आणि मग आण्णा छानशा सावलीत शेकडो कावळ्यांना जेवण घालतात. आण्णांना ही रोजचीच सवय झाली आहे आणि कावळ्यांनाही त्यांचा लळा लागला आहे. इतकेच नाही तर आता सकाळी आण्णांची वाट कावळे बघत असतात शेतातल्या रत्यावरून आण्णांची मोटारसायकल दिसली की, मोटारसायकलसोबतच कावळे उडत रोजच्या ठिकाणी येतात.
हेही वाचा - पुण्यात भाजपचा पश्चिम महाराष्ट्र विजय संकल्प मेळावा; उदयनराजेंची दांडी
पितृ पंधरवाड्यात कावळ्यांना मान असतो व इतर दिवस कावळ्यांकडे आपण दुर्लक्ष करीत असतो. दोन वेळचे कसेबसे पोट भरण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी खेडेगावात चहा व पाववड्यांच्या टपरीवर गुजराण करुन मुलांनी शिकावे, यासाठी त्यांना शहरात पाठवून कसेतरी पैसे पुरवून मुलांचे शिक्षण पुर्ण करत, थोडयाशा शेतीवर उदरनिर्वाह करुन अध्यात्माची आपल्या जीवनाशी सांगड घालून घेऊन पशु-पक्षींवर जगताप हे प्रेम करतात. माणसाची आर्थिक परिस्थिती कशीही असो मात्र, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणारा भुतदया मानणारा अवलीया आण्णा जगताप हे अनोखेच व्यक्तीमत्त्व आहेत.