इगतपुरी (नाशिक) - तालुक्याची तहान भागवणारे व सिंचनासाठी उपयुक्त असणारे भावली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. ते धरण आता ओसंडून वाहत आहे. हे धरण दारणा नदीच्या उगमस्थानी असून दीड हजार दशलक्ष घनफूट याची साठवण क्षमता आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नाशिक जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे ऑगस्ट महिन्यामध्ये ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत होते. मात्र, यावर्षी याउलट चित्र जिल्हाभरात पहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याचे पहायला मिळत आहे.
मात्र, बुधवारी (दि. 5 ऑगस्ट) सकाळी भावली धरण ओव्हर फ्लो झाले आहे. धरण भरल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.