ETV Bharat / state

Minister Chhagan Bhujbal on MNC Election : सगळे मतदारसंघ लढवण्याची तयारी ठेवा; मंत्री छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आदेश - नाशिक महानगरपालिका निवडणूक 2022

महानगरपालिका निवडणुकीत ( MNC Election 2022 ) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शिवसेना व कॉंग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. मात्र, तसे झाले नाही तरी सगळे मतदारसंघ लढवण्याची तयारी ठेवा, असा आदेश छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. ( Minister Chhagan Bhujal on MNC Election 2022 )

ncp meeting nashik
राष्ट्रवादी काँग्रेस बैठक नाशिक
author img

By

Published : Jan 11, 2022, 4:59 PM IST

नाशिक - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी आगामी महानगरपालिका निवडणूका ( MNC Election 2022 ) स्वबळावर लढवण्याची सूतोवाच केले आहे. यानंतर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शिवसेना व कॉंग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. मात्र, तसे झाले नाही तरी सगळे मतदारसंघ लढवण्याची तयारी ठेवा, असा आदेश छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. ( Minister Chhagan Bhujal on MNC Election 2022 ) भुजबळ फार्म येथे कार्यकर्त्यांशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ

पक्षवाढीसाठी काम करा -

ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने न्यायालयात केस दाखल करण्यात आलेली आहे. त्याचा निकाल लवकरच येईल. मात्र, निकालाची वाट न पाहता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे. नाशिक महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ सध्या जरी कमी असले तरी यंदाच्या वेळेस मात्र आपल्याला ती भरपाई करावी लागणार आहे. जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी करावी. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक वाढविण्यासाठी काम करावे. त्यादृष्टीने अधिक प्रयत्न करावे. तसेच विविध उपक्रम राबवीत असतांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

हेही वाचा - Sharad pawar on asembaly election : राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार, शरद पवारांची मोठी घोषणा

ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकारला संपूर्ण राज्यातील जनतेची पसंती आहे. वरिष्ठ पातळीवर सन्मानजनक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तरीदेखील संपूर्ण जागांवर आपल्याला लढायची तयारी करण्यात यावी. त्यासाठी शहरात इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या वार्डात निवडणुकीच्या कामाला लागावे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलून त्या ठिकाणी सक्रिय सदस्याला जबाबदारी देण्यात यावी. शहरातील सर्व सहा विभागात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येऊन जबाबदारीचे वाटप करण्यात यावे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी दृष्टीने अधिक जोमाने कामाला लागावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.