नाशिक- बकरी ईद हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सोमवारी होणाऱ्या बकरी ईद निमित्ताने नाशिक शहरातील सर्व मशिदींची रंगरंगोटी करण्यात आली आहे. यावेळी कुर्बानी देण्यासाठी बोकडांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे देशाच्या विविध ठिकाणाहून बोकडांची शहरात आयात करण्यात आली आहे.
उद्या(सोमवारी) होणार्या बकरी ईद करता राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश ,पंजाब, पुणे, संगमनेर येथून 15 हजार पासून ते 10 लाख किंमतीपर्यंतचे बोकड नाशिक शहरात विक्रीसाठी आले आहेत. बोकड खरेदीसाठी मुस्लिम बांधवानी गर्दी केली असून ह्या वर्षी बोकडाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
इस्लामी मान्यतेनुसार आधी बोकड्याचे पालन पोषण करून त्याची काळजी घेतली जाते. त्यानंतरच तो अल्लाहच्या नावे कापला जाण्यची प्रथा आहे.