ETV Bharat / state

बागलाण तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान; पंचनामे सुरू

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या पावसात बागलाण तालुक्यात पशुधन, घरे आणि डाळिंब बागांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. 63 जनावरे दगावली असून 23 घरांची पडझड झाली आहे.

damage during nisarga cyclone
वादळी पावसामुळे झालेले नुकसान
author img

By

Published : Jun 5, 2020, 12:28 PM IST

सटाणा(नाशिक)- निसर्ग चक्रीवादळाच्या काळात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने बागलाण तालुक्यात अनेक जनावरे मृत्यूमुखी पडण्यासोबतच घरांची पडझड व शेतमालाच्या झालेल्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. आमदार दिलीप बोरसे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल भरपाईसाठी शासनाकडे पाठवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

Cow died during heavy rain in cyclone
वादळी पावसात दगावलेली गाय

बागलाण तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या पावसात पशुधन, घरे आणि डाळिंब बागांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. तालुक्यातील राहुड, वघानेपाडा, टिंगरी, श्रीपूरवडे, ढोलबारे येथील बारा शेतकऱ्यांच्या सोळा गायी, बारा वासरे, शेळ्या, बोकड आणि मेंढ्या अशी ६७ जनावरे मृत्यूमुखी पडून सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तालुक्यात नामपूर, अजमीर सौंदाणे, तळवाडे दिगर, टिंगरी येथे प्रत्येकी चार, ढोलबारे पाच, ब्राह्मणगाव, ताहाराबाद, नरकोळ येथे प्रत्येकी एक अशा २३ घरांची पडझड तसेच घरांवरचे पत्रे उडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

damage during nisarga cyclone
वादळी पावसामुळे झालेले नुकसान

वादळी पावसामुळे कोटबेल, वीरगाव, फोपीर, नळकस, खिरमाणी, वनोली, आव्हाटी या भागातील डाळिंब बागा भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. डाळिंब बागांसह कांदा व बाजरीचे उभे पीक भिजून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. बहर आलेली डाळिंबाची झाडे भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

शहरासह तालुक्यात बुधवारी सायंकाळपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. वादळामुळे बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.