दिंडोरी ( नाशिक ) - देशात कोरोना विषाणूचा मोठया प्रमाणावर वाढत असताना दिंडोरी नगर परिषदेचे गटनेते व नगरसेवक यांच्यामार्फत दिंडोरी तालुक्यातील पत्रकारांना आर्सेनिक अल्बम औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी, दिंडोरी व दिंडोरी शहर विकास आघाडीचे गटनेते प्रमोद शिवाजीराव देशमुख, चंद्रकांत राजे, नगरसेवक तुषार भाऊ वाघमारे, नरेंद्र जाधव, निलेश विजय गायकवाड, काका देशमुख, दत्तू आण्णा जाधव, साजन पगारे, रवीशेठ जाधव, भास्करराव कराटे, शाम मुरकुट, विक्रम राजे, सुहास देशमुख, दीपक देशमुख यांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकारांना आर्सेनिक अल्बम ३० औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.
मेकवेल इंडस्ट्रिज सिन्नर यांचे संचालक संजय शहा व होमिओपॅथिकचे डॉ अनूप गावांदे व तुषार वाघमारे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच पुढील एक महिन्यानंतरचे बुस्टर डोस कंपनीमार्फत वितरित करण्यात येतील, अशी माहिती प्रमोद देशमुख यांनी दिली.
यावेळी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कल्याणराव आवटे दिंडोरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कथार, भगवान गायकवाड, केशव चिते, बंडा महाराज खडांगळे, विलास जमदाडे, किशोर जाधव , बाळासाहेब अस्वले, संजय थेटे, बापू चव्हाण, राजेंद्र जाधव, दत्तात्रय आवारे, गोरख जोपळे, सुरेश रंधे, सचिन देवरे व इतरांना वाटप करण्यात आले.