ETV Bharat / state

Nashik ST Bus : खाजगी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग ; डेपोत पोलीस बंदोबस्त वाढविला

नाशिकमध्ये खाजगी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बस सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. आज 50 खाजगी बस चालक सेवेत दाखल ( 50 private drivers enter bus service ) झाले आहेत. मात्र याला आंदोलक कर्मचाऱ्यांनी विरोध (Opposition of agitating workers ) केला आहे. कोणताही अनुभव नसताना बस ताब्यात कशा दिल्या, असा सवाल आंदोलक कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला आहे.

नाशिक एसटी बस
नाशिक एसटी बस
author img

By

Published : Jan 12, 2022, 1:36 PM IST

नाशिक : नाशिकच्या मुख्य आगारातून आज पोलीस बंदोबस्तात ( Police security at Nashik main depo ) नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या वेग वेगळ्या भागात तब्बल 50 बसेस रवाना करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रक्रियेला आंदोलक कर्मचाऱ्यांचा विरोध असल्याने बस आगारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या अतिरिक्त बंदोबस्ताने आगाराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मदतीने सुरू करण्यात आलेली बससेवा ही प्रवाशांच्या जीविताशी खेळणारी आहे, 45 दिवसाची ट्रेंनिग कायम कर्मचाऱ्यांना बंधनकारक असतांना, आज मात्र केवळ 2 दिवसाच ट्रेनिंग देत कंत्राटी कर्मचारयांच्या हातात लाल परी दिली जात आहे. असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

दरम्यान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू करण्यात आलेली बससेवा ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच सुरू केली आहे. तसेच ज्यांच्या हातात लाल परी दिली आहे, ते सर्व लोक परवाणा धारक आहेत. त्यांच्या संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय तपासणी देखील झाली आहे. त्यामुळे या आरोपात तथ्य नाही उलट आजही जे कर्मचारी सेवेत दाखल झाले नाही, त्यांनी सेवेत दाखल व्हावे अस आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळच्या सत्रात 40 मार्गस्थ -

बुधवारी पहाटे पोलिसांनी 25 कर्मचाऱ्यांना ताब्यात देखील घेतले आहे. त्यामुळे आता प्रशासन आंदोलनकर्त्यांचा विरोध (Opposition of agitating workers ) मोडीत काढत बस सेवा सुरू करण्यावर आग्रही असल्याचं चित्र आहे. सकाळच्या सत्रात 40 बसेस नाशिक जिल्ह्याच्या विविध भागासह धुळे, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव या जिल्ह्यात मार्गस्थ करण्यात आल्या आहेत. बसेसवा अविरत सुरू ठेवण्यासाठी प्रशासन आग्रही असलं तरी आंदोलक मात्र आपल्या लढ्यावर ठाम आहेत. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करत 22 एसटी कर्मचारी संघटनांना (22 ST Employees Union ) कामावर रुजू होण्यास सांगितले. त्यामुळे या सर्व संघटनांनी संप मागे घेतल्याची घोषणाही केली. मात्र नाशिकमधील कर्मचारी अद्यापही संपाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत लढा सुरु राहील असे त्याचे म्हणणे आहे. मात्र या सर्वांना विरोध करीत आज प्रशासानाने नाशिकमधून खाजगी कर्मचाऱ्यांद्वारे बसेस रस्त्यावर उतरवल्या आहेत. त्यामुळे आंदोलक कर्मचारी नाराज आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.