नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या गावी गेले आहेत. यामुळे विविध ठिकाणच्या विकासात्मक कामांना ब्रेक लागला असून दिंडोरी तालुक्यातून दोन राज्याला जोडणारा महामार्गाचेही काम रखडले होते. पण, स्थानिक कामगारांच्या मदतीने या पुलाची कामे लवकर पूर्ण करावीत, अशा सुचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिल्या आहेत.
शिर्डी पिंपळगाव ते सापुतारा राष्ट्रीय मार्गावरील नदीवरच्या पुलाचे काम पावसापूर्वी पूर्ण कराण्यासाठी उपाध्यक्ष झिरवाळ यांनी सुचना दिल्या असून त्या सुचनांचे पालन करत उत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक कामगारांचा शोध सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करु, असे व्यवस्थापक राकेश पाटील यांनी सांगीतले.
या कामासाठी स्थानिक मजूर शोधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या विविध नियमांचे पालन करत हे काम पूर्ण करणे हे आव्हानात्मक काम आहे, असेही राकेश पाटील याने सांगीतले.
हेही वाचा - मालेगाव तालुक्यातील दाभाडीत आढळले ७ करोनाबाधित रुग्ण