नाशिक: लिव्ह इन रिलेशनशिप ( live in relationship) म्हणजे लग्नाची गाठ न बांधता एकमेकांच्या सहमतीने एकत्र राहणे. भारतामध्ये लिव्ह रिलेशनशिपला कायद्याने मान्यता नसली, तरी हल्ली लिव्ह इन रिलेशनशिप संबंध ही सर्वसाधारण बाब झाली आहे.या नात्याबद्दल अनेकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मात्र, या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे चांगले तेवढेच वाईट अनुभव येऊ शकता.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे हे जातीतून धर्मातून वेगळ्या कुटुंब संस्कारातून एकत्र आलेले असतात. अशात सुरवातीला चांगले वाटणारे नाते एकमेकांच्या सवयी, स्वभाव या गोष्टी न जुळल्यामुळे वाद विवादाचे कारण ठरतात. तसेच या मध्ये एकत्र राहताना आर्थिक गोष्टीमुळे सुद्धा कारण ठरू शकतात.
या सगळ्या गोष्टी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोघांमध्ये घडत असल्याने अनेकदा त्यांना मनमोकळे करण्यासाठी तसेच यावर पर्याय काढण्यासाठी मदत मिळत नसल्याने हे नाते काही काळानंतर संपुष्टात येते. सांगत आहेत कौंसिलर रोहित शिरसाट.जाणून घ्या सविस्तर