नाशिक - ग्रामपंचायत सदस्य गमाविलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन संचालकांना पदापासून मुक्त व्हावे लागले आहे. जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी विद्यमान उपसभापती रवींद्र भोये, संचालक भाऊसाहेब खांडबहाले व माजी उपसभापती संजय तुंगार यांचे संचालक पद रद्द केले आहे.
निलंबित संचालकांमध्ये रवींद्र भोये हे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती आहेत. त्यामुळे बाजार समितीत पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघाले आहे. आगामी काळात याचे काय पडसाद उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा-आजच्या मोर्चात शेतकरी कमी आणि घुसवलेले लोक जास्त - प्रवीण दरेकर
ग्रामपंचायत सदस्य नसतानाही होते संचालक म्हणून पद रद्द...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक भाऊसाहेब खांडबहाले हे २०१७ ते २०२२ या कालावधी करीता झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते. त्यामुळे ते ग्रामपंचायत सदस्य नव्हते. दुसरे संचालक संजय तुंगार हे शिंदे ग्रामपंचायतमधून निवडून आल्याने बाजार समितीवर संचालक म्हणून काम करीत होते. त्यानंतर शिंदे गावाच्या निवडणुकीमध्ये ऑगस्ट २०१५ ते ऑगस्ट २०२० या कालावधीसाठी शिंदे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आले नाहीत. तसेच तिसरे संचालक तथा विद्यमान उपसभापती रवींद्र भोये हे २०१५ ते २०२० या पदावधी करिता झालेल्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत गटातून निवडून आले होते. भोये यांनी त्रंबकेश्वर तालुक्यातील दलपतपुर येथून ग्रामपंचायत गटातून पंचायत समितीवर निवडून गेल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यामुळे ते ग्रामपंचायत सदस्य पदावर नव्हते. तरीहीदेखील चालक पदी विराजमान होते.
हेही वाचा-लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय लवकरच -मुख्यमंत्री
जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी रीतसर सुनावणी घेत संचालकांचे पद केले रद्द...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १५ चा भंग करीत संचालक पद सुरू तीन संचालकांनी आर्थिक लाभ घेतले असल्याचे एका तक्रारदाराने अर्जात म्हटले होते. यावर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी रीतसर सुनावणी घेत अंतिम निर्णय दिला आहे. यात कृउबाचे विद्यमान उपसभापती रवींद्र भोये, संचालक भाऊसाहेब खांडबहाले व माजी उपसभापती संजय तुंगार यांची संचालक पद रिक्त झाल्याचे आदेश देण्यात आले आहेत.