नाशिक - एकीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त शेतकऱ्यांचे शेतीसाठी जोडलेले वीज कनेक्शन दोन दिवसांपासून खंडित केले आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आलेले भाजपचे आमदार दिलीप मंगळू बोरसे यांना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील केरसाणे ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घातले.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना घडला प्रकार -
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे शेतीसाठी जोडलेले वीज कनेक्शन खंडित करण्यात आल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या बीजेपी आमदार दिलीप बोरसे यांना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील केरसाने ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये कुलूपबंद केले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान जोपर्यंत शेतीसाठी लागणारे वीज कनेक्शन पुन्हा जोडले जात नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आमदारांना पडू देणार नाही, असा इशारा देत ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर या शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला होता.
हे ही वाचा - वाघांचे मृत्यूसत्र सुरूच; आणखी एक आढळला मृतदेह, तीन महिन्यात १३ वाघांचा मृत्यू
वीज जोडणीला सुरुवात झाल्यानंतर शेतकर्यांनी आमदारांना सोडले -
दरम्यान यावेळी आमदार दिलीप बोरसे यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या शेतीतील वीज जोडणीला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली. त्यानंतर या शेतकर्यांनी आमदार सोडले मात्र एकीकडे अवकाळी पावसाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी अशाप्रकारे त्रास देण्यात येत असल्याने महावितरणाच्या या आडमुठ्या धोरणाचा सटाण्यातील शेतकऱ्यांनी केलेला निषेध सध्या जिल्हाभरात चर्चेचा विषय बनला आहे.