नाशिक - त्र्यंबकेश्वर येथील शेंद्री पाडा ( Shendri Pada ) येथे तत्कालीन पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी बांधून दिलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा लाकडी बल्ल्यांवरून पाण्याचा हंडा घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
काही महिन्यांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ( Trimbakeshwar Taluka ) शेंद्री पाडा येथील लाकड्या बल्ल्यावरून महिलांचा हंडे घेऊन जातानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठया प्रमाणत व्हायरल झाला होता. या व्हिडीओची दाखल घेत तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Former Environment Minister Aditya Thackeray ) यांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तात्काळ लोखंडी पूल ( Iron bridge ) उभारण्याचे काम सोपवले होते.
लोखंडी पूल वाहून गेला - आदित्य ठाकरे यांनी लोखंडी पूल उभारून त्याचे स्वतः या पुलाच्या उद्घाटन केले होते. मात्र, गेल्या काही दिवसात नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणत पाऊस झाला. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली होती. याच पुराच्या पाण्यात हा लोखंडी पूल वाहून गेला आहे.त्यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा हंडाभर पाण्यासाठी लाकडी बाल्यावरून जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
आदित्य ठाकरे आज नाशकात - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी शिवसेनेला धक्का देत भाजप सोबत जाऊन राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यानंतर राज्यात युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विशेष दौऱ्यास प्रारंभ केला आहे.शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आज आदित्य ठाकरे आज 22 जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे..
हेही वाचा - Breaking Metro Carshed Project in Aarey : महाविकास आघाडीला धक्का, आरेमधील कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठविली