ETV Bharat / state

'टाकाऊपासून टिकाऊ वस्तू'; येवल्याच्या तरुणीचा 'संपूर्णम' उपक्रम - trupati gaikwad yeola

नाशिकच्या येवल्यातील तृप्ती गायकवाड या पेशाने वकील आहेत. सध्या त्यांनी एक अनोखा असा 'संपूर्णम' नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून त्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवतात.

trupati gaikwad
तृप्ती गायकवाड
author img

By

Published : Sep 22, 2021, 5:15 PM IST

येवला (नाशिक) - पर्यावरणाचा ऱ्हास व प्रदूषण थांबवण्यासाठी येवल्यातील तृप्ती गायकवाड या तरुणीने 'संपूर्णम' उपक्रम हाती घेतला आहे. त्या माध्यमातून टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू ही तरुणी तयार करत आहे.

  • टाकाऊपासून टिकाऊ वस्तू -

हेही वाचा - महंत नरेंद्र गिरींचा गुदमरून मृत्यू; शवविच्छेदन अहवालात समोर

नाशिकच्या येवल्यातील तृप्ती गायकवाड या पेशाने वकील आहेत. सध्या त्यांनी एक अनोखा असा 'संपूर्णम' नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाद्वारे त्या देवदैवतांच्या जुन्या फ्रेम, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या लहान - मोठ्या खराब झालेल्या मूर्त्या, मंदिरात भग्नावस्थेतील ठेवलेल्या मूर्त्यांचे त्या संकलन करतात. गेल्या दीड ते दोन वर्षात त्यांनी पुण्यासह, नाशिक, मुंबई, सोलापूर, संगमनेर आदी वेगवेगळ्या शहरांतून अशा वस्तू जमा केल्या आहेत. त्यानंतर या सर्व वस्तूंची पर्यावरणपूरक पद्धतीने 'संपूर्णम' या उपक्रमाद्वारे विघटन करून त्यापासून चिमणीचे घरटे व पक्षी, प्राण्यांना दाणापाणीसाठी मातीचे भांडे, खेळणी, विटा यांची निर्मिती केली जाते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास व प्रदूषणही थांबण्यास मदत होत आहे.

  • विसर्जित प्रतिमा व मूर्ती संकलन -

नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलेला असताना त्या नदीमध्ये प्रतिमा विसर्जित करण्यासाठी काही व्यक्तीं येत होत्या. त्या व्यक्तीला तृप्ती यांनी थांबवून नदी प्रदूषित होऊ नये म्हणून समजावलं व पर्यावरणस्नेही विसर्जनाचा पर्याय सुचवला. त्या व्यक्तीला हे पटले आणि ऑगस्ट २०१९ पासून हा प्रवास सुरू झाला. त्यातून स्वतःच अशा प्रतिमा आणि मूर्तीचे संकलन करून त्याचे पुनःचक्रीकरण करण्याचा निर्णय तृप्ती गायकवाड यांनी घेतला. तेव्हापासून 'संपूर्णम' टीमच्या माध्यमातून मूर्ती व फ्रेम संकलनाचं काम सुरू झालं. आतापर्यंत 'संपूर्णम'च्या टीमने आठ ते दहा हजारांहून अधिक देवदेवतांच्या फ्रेम व अडीच हजारांहून अधिक मूर्तीचे संकलन केले आहे.

हेही वाचा - IPL 2021 : सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजाला कोरोनाची लागण; IPL वर अनिश्चिततचे सावट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.