ETV Bharat / state

Amruta Pawar Will Join BJP : खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय अमृता पवार जाणार भाजपात - Amruta Pawar will join BJP

नाशिकचे माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.स्थानिक नेतृत्वाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. अमृता पवार यांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो.

Amruta Pawar Will Join BJP
खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय अमृता पवार जाणार भाजपात
author img

By

Published : Mar 14, 2023, 5:24 PM IST

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी प्रदिर्घ काळ एकनीष्ठ असलेल्या पवार कुटूंबातील अमृता पवार यांचा भाजप प्रवेश अनेकांना धक्कादायक ठरला आहे. स्थानिक नेतृत्वाकडून वारंवार राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. त्याला कंटाळून हा निर्णय झाल्याची चर्चा आहे. आर्कीटेक्ट असलेल्या अमृता पवार या देवगाव (निफाड) जिल्हा परिषदेच्या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या होत्या. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का : नाशिकचे माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. स्थानिक नेतृत्वाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. अमृता पवार यांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो.

कोण आहेत अमृता पवार : अमृता पवार या आर्किटेक आहेत,माजी खासदार कै वसंत पवार यांच्या त्या कन्या आहेत, गोदावरी नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत.तळागाळात संपर्क असलेल्या कल्पक कार्यकर्त्या म्हणून त्या परिचीत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या त्या निकटवर्ती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या त्या पदाधिकारी आहेत. अमृता पवार या देवगाव (निफाड) जिल्हा परिषदेच्या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या होत्या.

येवला मतदार संघाचा होऊ शकतो विचार : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ गेल्या अनेक वर्षापासून येवला मतदार संघाचे नेतृत्व करत आहे, मात्र आगामी निवडणुकी त समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत, हा मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजपाकडून जोरदार तयारी केली जात आहे, याच मतदारसंघात अमृता पवार यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे,या माध्यमातून भुजबळ यांना शह देण्यासाठी भाजप अमृता पवार यांना निवडणुकीत उतरवले अशी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : Old Pension Scheme Strike Pune : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संप; कर्मचारी म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.