नाशिक - 'माझ्या पक्षाला महायुतीत एक जागा सोडली. या बद्दल समाधानी असल्याचे' रासप पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी म्हटले. या निवडणुकीत महायुतीला 225 जागा मिळतील, असा विश्वास देखील जानकर यांनी व्यक्त केला. येथील महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारासाठी जानकर आले असता, त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला विशेष मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.
ज्यांनी बंडखोरी केली ते आमचे नाहीत
महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा नंतर आज त्यांनी नाशिकच्या महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारासाठी आयोजित मोटार सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला. महायुतीतील स्टार प्रचारक नेते 370 कलम रद्द केले या विषया सोबत स्थानिक मुद्यांना देखील हात घातला आहेत. 70 वर्षात जे कॉंग्रेस पक्षाने केलं नाही, अश्या अनेक विकासाच्या गोष्टींची सुरवात भाजप काळात मागील पाच वर्षात झाल्याचं जानकर म्हणाले. आम्ही चांगली रस्ते, पाणी, वीज, रोजगार निर्मिती कशी वाढेल, असे अनेक मुद्दे घेऊन प्रचार करत आहोत. ज्यांनी बंडखोरी केली ते आमचे नाहीत. महाराष्ट्रातील जनता सुधान असून बंडखोर उमेदवरांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मातांनी निवडून देतील. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवतील, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.
मी समाधानी आहे, की मला महायुतीत एक जागा मिळली. महायुतीची सत्ता आल्या नंतर मला कुठल्याही प्रकारचे आश्वासन भाजप सेनेने दिलं नाही. या निवडणूकीत महायुतीला 225 जागा मिळतील, असा विश्वास देखील महादेव जानकर यांनी व्यक्त केला.