मालेगाव (नाशिक) Advay Hire Arrest News: मालेगाव इथल्या रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी कर्ज घेण्याकरिता बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची 7 कोटी 46 लाख रुपयांचं कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना ताब्यात घेण्यात आलंय. नाशिक पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं मध्य प्रदेशातील भोपाळ इथून अद्वय हिरे यांना ताब्यात घेण्यात आलंय. मालेगावच्या रमजानपूरा पोलिसांत त्यांना बुधवारी रात्री उशिरा चौकशीसाठी आणण्यात आलं. रमजानपुरा पोलिसांत अटक नोंद केल्यानंतर हिरे यांना नाशिक इथं आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आलंय.
भुसे आणि हिरे यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप : हिरे यांना नाशिक इथं नेत असताना त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस वाहनाला गराडा घातला. त्यामुळं काही काळ मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी मंत्री दादा भुसे यांच्या विरुद्धही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मालेगाव येथील न्यायालयात त्यांना आज हजर केलं जाणार आहे. मंत्री दादा भुसे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेच्या फसवणूक प्रकरणी अद्वय हिरेंवर नाव न घेता ताशेरे ओढले होते. तब्बल 32 कोटींचा हा घोटाळा असून सहकार खातं निश्चितपणे यावर कारवाई करेल, असा इशारा मंत्री भुसे यांना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना अप्रत्यक्षपणे मागील काही महिन्यांपूर्वी दिला होता.
-
#WATCH | Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "Advay Hiray is an important leader of Shiv Sena. He comes from Nashik Malegaon. When he was in the BJP, no proceedings happened against him in this same case... Ajit Pawar was accused by the PM... Advay Hiray is… pic.twitter.com/1RQQ9sJXSU
— ANI (@ANI) November 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "Advay Hiray is an important leader of Shiv Sena. He comes from Nashik Malegaon. When he was in the BJP, no proceedings happened against him in this same case... Ajit Pawar was accused by the PM... Advay Hiray is… pic.twitter.com/1RQQ9sJXSU
— ANI (@ANI) November 16, 2023#WATCH | Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "Advay Hiray is an important leader of Shiv Sena. He comes from Nashik Malegaon. When he was in the BJP, no proceedings happened against him in this same case... Ajit Pawar was accused by the PM... Advay Hiray is… pic.twitter.com/1RQQ9sJXSU
— ANI (@ANI) November 16, 2023
नेमकं प्रकरण काय : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अद्वय प्रशांत हिरे आणि एकूण 30 जणांविरोधात 30 मार्च 2023 रोजी मालेगावच्या रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बनावट दस्तऐवज तयार करुन शासनाची तब्बल 7 कोटी 46 लाख रुपयांची कर्ज उचलून फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता. त्यानंतर आरोपी अद्वय हिरे यांनी मालेगाव सेशन कोर्टात जामिनासाठी धाव घेतली होती. त्यानंतर ते अंतरिम जामीनासाठी हायकोर्टाकडे ते गेले होते. मात्र 6 नोव्हेंबर 2023 ला तो अर्ज फेटाळताच स्थानिक गुन्हे शाखेनं भोपाळमधून त्यांना ताब्यात घेतलंय.
मागील काही दिवसांपासून हिरे कुटुंबीय अडचणीत....! नाशिक जिल्हा परिषदेकडे नियमबाह्य पद्धतीने प्रस्ताव पाठवून शहरातील आदिवासी सेवा संस्थेसह महात्मा गांधी विद्या मंदिरात शिक्षक व लिपिकांची बोगस भरती केल्याप्रकरणी प्रकरणातही हिरे कुटुंबीय अडचणीत आले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संस्थेच्या प्रमुख माजी मंत्री पुष्पाताई हिरे व माजी मंत्री संस्थेचे सेक्रेटरी प्रशांत हिरे, जॉइंट सेक्रेटरी डॉ. अपूर्व हिरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्यासह 66 जणांना विरोधात फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक डॉ किरण कुवर यांच्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचालक मंडळातील 25 पदाधिकारी,सदस्य,22 शिक्षक,12 शिपाई,6 लिपिक अशा 66 जणांवर तर आदिवासी सेवा समितीतील भरती प्रकरणी 31 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित जवळपास दोन्ही गुन्ह्यात सारखेच आहे.
हेही वाचा :
- Dada Bhuse On Lalit Patil Case: संजय राऊतांच्या मार्गदर्शनात ड्रग्ज माफिया ललित पाटील शिवसेनेत आला होता- दादा भुसे
- Dada Bhuse Lalit Patil Photo : ड्रग्ज माफिया ललित पाटीलसोबत मंत्री दादा भुसेंचा फोटो व्हायरल; सुषमा अंधारे म्हणाल्या...
- कांदा खाऊ नका... म्हणणे मस्तवालपणा - संजय राऊतांचा दादा भुसेंना टोला