ETV Bharat / state

नांदगाव तालुक्यात 59 ग्रामपंचायतींची निवडणूक; प्रशासनाने कसली कंबर - तहसीलदार उदय कुलकर्णी

राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या 527 जागांसाठी देखील येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

ocal body elections in nashik
नांदगाव तालुक्यात 59 ग्रामपंचायतींची निवडणूक; प्रशासनाने कसली कंबर
author img

By

Published : Dec 25, 2020, 12:44 PM IST

नाशिक - राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या 527 जागांसाठी देखील येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी ग्रामस्थ व उमेदवार यांची लगबग सुरू असतानाच दुसरीकडे प्रशासकीय स्तरावर देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. तहसील कार्यालयात यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून 59 ग्रामपंचायतसाठी 40 निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी दिली आहे.

नांदगाव तालुक्यात 59 ग्रामपंचायतींची निवडणूक; प्रशासनाने कसली कंबर

प्रशासकीय स्तरावर जय्यत तयारी

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जवळपास तहसील आणि प्रांत कार्यालयांना जत्रेचं स्वरुप आलं आहे. दिवसभरात 95 ते 110 च्या आसपास विविध घोषणापत्र तयार करण्यात येत असून सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रशासकीय स्तरावर देखील जय्यत तयारी करण्यात आली असून तहसील कार्यालयातील इमारतीच्या वरच्या मजल्यावर यासाठी स्वतंत्र निवडणूक कक्ष तयार करण्यात आला आहे.

या ठिकाणी प्रत्येक गावासाठी एक टेबल लावण्यात आला असून या ठिकाणी फॉर्म स्वीकारले जात आहेत.तहसील कार्यलयच्या खालच्या बाजूला देखील विविध टेबल लावून त्यात फ़ॉर्म तपासणी मतदान यादी विक्री यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिमिटर ने तपासणी केल्यानंतरच निवडणूक कक्षात प्रवेश दिला जात आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज असून कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी अधिकारी काळजी घेत आहेत.

नांदगाव तालुका ग्रामपंचायत तपशीलवार

एकूण ग्रामपंचायत 59
एकुण प्रभाग 193
एकुण मतदान केंद्र 217
एकुण उमेदवार संख्या 527
एकुण मतदार संख्या 1 लाख 2 हजार 408
पुरुष मतदार 49,500
महिला मतदार 44,244

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.