नाशिक - सध्याचे युग तंत्रज्ञानाचे ( Information Technology ) आहे. बहुतांश गोष्टी मोबाइलच्या एक क्लिक वर उपलब्ध होतात. कुठली माहिती शोधण्यासाठी नागरिक आता मोबाइलचा वापर ( Use of mobile to search for information ) करतात. यात तरुण पिढी आघाडीवर आहे. नाशिकच्या आदीश्री अविनाश पगार ( Adishree Pagar ) या सहावीत शिकणाऱ्या 11 वर्षीय चिमुरडीने एक दोन नाही तर वेगवेगळे विषय हाताळत पाच ॲपससह तीन वेबसाईटची निर्मिती ( Adishree Pagar created three websites with five apps ) केली आहे .सध्या तिने बनवलेल्या ट्रॅफिक ॲपची सर्वत्र चर्चा आहे. या ॲपमध्ये अपघात होऊ नये तसेच वाहतुकीची ( Social awareness through website ) नियम, ट्रॅफिक चिन्ह, राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधील वाहन नोंदणी क्रमांक या बाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे, हे ॲप सर्व वाहन धारकांना उपयुक्त असे आहे.
तुफान आलंया या कार्यक्रमातुन प्रेरित - आदीश्री अविनाश पगार ही पोतदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिक्षण घेत आहे. आदीश्रीने पहिलीत असतांना पहिले ॲप बनवले होते. अमीर खानच्या तुफान आलंया या कार्यक्रमातून प्रेरित होऊन तिने वॉटर सेन्सेशन या ॲपच्या माध्यमातून पाणी बचतीचे महत्व पटवून दिले आहे. पाणी फाउंडेशनचे काम सांगणारे वॉटर लाइफ, सेव वॉटर तसेच वॉरियर्स ऑफ हेल्थ या वेबसाईटची निर्मिती केली आहे. तिची माझ्या मनात स्वप्नातील गाव ही वेबसाईट स्वप्नातील गावाचा प्रचार, प्रसार करणारी आहे. इंग्रजी,मराठी भाषेमधील या वेबसाईटच्या माध्यमातून गावात हवे असणाऱ्या गोष्टींची माहिती दिली आहे. शासकीय योजनांचे महत्त्व, आरोग्य सेवा केंद्र, झाडांचे महत्त्व, साक्षरता, जल व्यवस्थापन आदी बाबी तिने यात मांडल्या आहेत. शेती पूरक व्यवसाय असलेले पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मस्त शेती, कुक्कुटपालन आदींची माहिती देखील तीने यामध्ये माहिती दिली आहे. एकूणच ॲप, वेबसाईटमुळे आदीश्रीची सर्वत्र अँड्रॉइड गर्ल ( Nashik Android Girl ) म्हणून ओळख होताना दिसत आहे. यापुढे आणखी वेगवेगळ्या समाजप्रबोधनात्मक ॲप, वेबसाईटची निर्मिती करायची असल्याचे तिने सांगितले.
![Adishree Pagar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-androidgirlnew-7204957_01122022182304_0112f_1669899184_922.jpg)
झाडांचे क्यूआर कोड - आदीश्रीने नाशिक शहर तसेच परिसरातील भारतीय जातीच्या तब्बल दीडशे झाडांचा क्यूआर कोड तयार केला आहे. या क्यूआर कोडवर क्लिक करताच त्या झाडाची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. काही महिन्यांपूर्वी उंटवाडीतील 100 वर्ष जुना वटवृक्ष तोडला जाणार होता त्यावेळी वृक्षप्रेमींच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत तिने त्या वटवृक्षावर क्यूआर कोड लावला होता. अनेकांनी तो स्कॅन करून वरील झाडाची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती .
![Adishree Pagar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-androidgirlnew-7204957_01122022182304_0112f_1669899184_1.jpg)