नाशिक: जिल्ह्यात लाचखोरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा उपनिबंधकाला तब्बल ३० लाखांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले होते. काल नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी वैशाली धनगर आणि लिपिक नितीन जोशी हे लाच घेताना विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.
'टीमवर्क'मुळे कारवाई शक्य: लाचखोरांविरुद्ध कारवाई करताना टीमवर्कची भावना बाळगली जाते. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पेशल ब्रँचमध्ये असल्याची जाणीव करून दिली जाते. यामुळे जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा सर्व अधिकारी कारवाईसाठी उपस्थित राहतात. कारवाईमुळे तक्रारदारांचा विश्वास बसला आहे. त्यामुळे या विभागाकडे तक्रारीचा ओघ वाढला आहे. अनेक छापे शनिवार, रविवार सुटीच्या दिवशीसुद्धा घातले जात आहेत, असे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितले.
लाच स्वीकारणे हा गुन्हा आहे. कायदेशीर कामांसाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. तक्रारदारांनी 1064 क्रमांकावर किंवा नाशिक कार्यालयात संपर्क साधून तक्रार करावी. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर
लाच घेताना मुख्याध्यापिकेला अटक: दहा वर्षापासून कंत्राटी कर्मचाऱ्याकडून वेतन काढून देण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारताना एका मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले आहे. माणिकलाल रोहिदास पाटील (५२) असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील आदिवासी विकास विभागाची वैतरणानगर येथे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आहे. या शाळेत तक्रारदार गेल्या १० वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी म्हणून मानधनावर काम करत आहे. १६ नोव्हेंबर २०२१ ते ११ जानेवारी २०२२ पर्यंत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नाशिक येथील आदेश काढून देण्यासाठी तसेच, वरील कालावधीचे वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक माणिकलाल रोहिदास पाटील याने १० हजारांची लाच ११ मार्चला मागितली होती.
हेही वाचा: