ETV Bharat / state

नाशिकातील सह्याद्री कंपनीला मिळाले द्राक्षांच्या प्रसिद्ध 'आरा' जातीचे भारतातील सर्वाधिकार - जागतिक बाजारपेठ

कृषी क्षेत्रात अशा प्रकारचा बहुमान मिळवणारी सह्याद्री फार्म ही देशातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी ठरली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना विलास शिंदे
author img

By

Published : Jul 4, 2019, 8:29 AM IST

नाशिक - द्राक्षांच्या प्रसिद्ध 'आरा' या कॅलिफोर्निया जातीचे भारतातील सर्वाधिकार येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला देण्यात आले आहेत, अशी माहिती सह्याद्रीचे चेअरमन विलास शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत येथे दिली. ब्रिटनमधील कृषी क्षेत्रातील अग्रगण्य समजली जाणारी जुपिटर याप्रसिद्ध कंपनीने हे अधिकार प्रदान केले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना विलास शिंदे

कृषी क्षेत्रात अशा प्रकारचा बहुमान मिळवणारी सह्याद्री फार्म ही देशातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी ठरली आहे. केवळ फळ उत्पादन क्षेत्रातच नव्हे तर कृषी क्षेत्रातही अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद गोष्ट असल्याची भावना विलास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. सहा खंडांमध्ये 24 देशात 'आरा 'जातीची द्राक्ष उत्पादित केल्या जाणाऱ्या देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. द्राक्षांच्या सुप्रसिद्ध अशा 'आरा' या कॅलिफोर्निया जातीचे उत्पादन आणि विक्रीचे भारतातील सर्व अधिकार हे येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला मिळाले आहेत. सह्याद्रीचे चेअरमन आणि व्यवस्थापक विलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

निर्यातक्षम 'आरा'च्या व्हरायटीचे सर्वाधिकार सह्याद्री कंपनीला मिळाल्याने राज्यभरातील द्राक्ष उत्पादकांना विशेषत: छोट्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. द्राक्षांना जागतिक बाजारपेठ आणि मूलभूत सुविधा यांचा फायदा मिळेल. द्राक्ष उत्पादन आणि विक्रीत महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. गेल्या काही वर्षात बदलते प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च, टिकवणक्षमता, उत्पादकता, रोगप्रतिकारक आणि निर्यातक्षम द्राक्ष जातीचा अभाव आणि बाजारपेठेच्या समस्या आदी अनेक तऱ्हेच्या समस्यांनी द्राक्ष उत्पादक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सह्याद्री फार्मच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Intro:द्राक्षाच्या सुप्रसिद्ध 'आरा' या कॅलिफोर्निया जातीचे भारतातील सर्वाधिकार नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला सुपूर्द करण्यात आले आहेत सह्याद्रीचे चेअरमन विलास शिंदे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली

Body:द्राक्षाच्या सुप्रसिद्ध अशा 'आरा' या कॅलिफोर्निया जातीचे उत्पादन आणि विक्रीचे भारतातील सर्व अधिकार हे नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ला मिळाले आहेत कृषी क्षेत्रातील अग्रगण्य समजली जाणारी जुपिटर या ब्रिटनमधील प्रसिद्ध कंपनीने 'आरा 'चे भारतातील सर्वाधिकार सह्याद्री फार्मला नुकतेच प्रदान केले सह्याद्रीचे चेअरमन आणि व्यवस्थापक विलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

Conclusion:कृषी क्षेत्रात अशा प्रकारच्या बहुमान मिळवणारी सह्याद्री फार्म ही देशातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी ठरली असून केवळ फळ उत्पादन क्षेत्र नव्हे तर कृषी क्षेत्रात ही अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद गोष्ट असल्याची भावना विलास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलीय सहा खंडांमध्ये 24 देशात 'आरा 'जातीची द्राक्ष उत्पादित केली जातात भारताचा समावेश आता यामध्ये झाला आहे
निर्यातक्षम 'आरा' व्हरायटीचे सर्वाधिक अधिकार सह्याद्री सारख्या देशातल्या आघाडीच्या शेतकरी उत्पादक कंपनीला मिळाल्याने केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातही द्राक्ष उत्पादकांना विशेषत: छोट्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे द्राक्षमधील जागतिक पायाभूत सुविधा आणि जागतिक बाजारपेठेचा फायदा मिळेल शिवाय द्राक्ष उत्पादन आणि विक्रीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य असुन गेल्या काही वर्षात द्राक्ष उत्पादक बदलते प्रतिकूल हवामान वाढलेला उत्पादन खर्च टिकवणक्षमता, उत्पादकता ,रोगप्रतिकारक आणि निर्यातक्षम द्राक्ष जातीचा अभाव आणि महत्त्वाचे म्हणजे बाजारपेठेच्या समस्या आदी अनेक तऱ्हेच्या समस्यांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर सह्याद्री फार्म प्रयत्न मुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.