ETV Bharat / state

Tiger Attack : वणी तालुक्यातील रांगणा येथे तरुणावर वाघाचा हल्ला; तरुण जागीच ठार

author img

By

Published : Nov 10, 2022, 10:51 PM IST

Tiger Attack: शेतशिवारात वाघाने एका तरुणावर शिकार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Tiger Attack
Tiger Attack

नाशिक: वणी तालुक्यातील भुरकी (रांगना) येथिल शेतशिवारात वाघाने एका तरुणाची शिकार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अभय मोहन देउळकर (25) असे मृतकाचे नाव आहे. अभय हा दररोज प्रमाणे आज दि 10 नोव्हेंबर ला बुधवारी शेळ्या चराईला घेऊन शेत शिवारात गेला होता. दरम्यान सायंकाळ होताच शेळ्या घराकडे परत आले आहे.

वन विभागाची टीम घटनास्थळी: परंतु अभय हा वापस आला नाही. घरच्यांनी गावात शोधाशोध केली परंतु कुठेही आढळुन न आल्याने अखेर त्याचा शोध घेतला असता झाडाझुडपात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती वनविभागाला दिली असता वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचले आहे.

नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण: सद्या वणी तालुक्यात वाघांचा वावर सुरु झाल्याने व आता मानव हानी होऊ लागल्याने शेतकरी शेतमजूर व नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्या कापूस वेचणीची लगबग सुरु असतानाच आता वाघाची दहशत निर्माण झाल्याने वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.