ETV Bharat / state

नाशिक : रस्त्यात प्रसूती झालेली 'ती' महिला कोरोनाबाधित - नाशिक प्रसूती झालेली महिला कोरोनाग्रस्त बातमी

गुरुवारी एका महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली होती. त्या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तिला व तिच्या बाळाला कोरोना कक्षात दाखल करण्यात आले आहे.

प्रसूतीनंतरचे छायाचित्र
प्रसूतीनंतरचे छायाचित्र
author img

By

Published : Sep 5, 2020, 10:06 PM IST

नाशिक - महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करून न घेतलेल्या एका महिलेची प्रसूती गुरुवारी (3 सप्टेंबर) रस्त्यावरच झाली होती. त्यानतंर त्या महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या महिलेला व तिच्या बाळाला तातडीने जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले आहे.

सिडको भागातील मोरवाडी येथील महानगरपालिकेच्या प्रसूती रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या एका गरोदर महिलेची प्रसूती रस्त्यातच झाली होती. त्यावेळी स्थानिक नगरसेविका भाग्यश्री डोमसे यांनी तत्काळ परिसरातील महिलांच्या मदतीने त्या महिलेला धीर देत तिची महिलेची प्रसुती भर रस्त्यात केली. या महिलेने एक गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाबाबत सर्वत्र टीका झाली होती. यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली व तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तिला व तिच्या बाळाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले आहे.

तीच महिला निघून गेली - डॉ. मोगल

या घटनेबाबत महानगरपालिका रुग्णालयाच्या डॉ. शीतल मोगल यांनी सांगितले की, ती गरोदर महिला तपासणीसाठी रुग्णालयात आली होती. तिची तपासणी केली असता कुठल्याही क्षणी तिची प्रसूती होऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्या महिलेची ती चौथी प्रसूती असल्याने खबरदारी म्हणून तत्काळ रुग्णालयात दाखल होण्यास सांगण्यात आले. मात्र, माझ्या घरी तीन मुले असून मी त्यांना भेटून येऊन घरच्यांना सांगून येते, असे सांगत ती महिला घरी जाऊन रुग्णालयात परत येत असताना तिची रस्त्यातच प्रसूती झाली. त्यामुळे या प्रकरणात रुग्णालयातील कोणीच दोषी नाही.

हेही वाचा - नाशिक मनपा हॉस्पिटलच्या अनास्थेचा फटका; रस्त्यावरच महिलेची प्रसूती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.