ETV Bharat / state

धक्कादायक : सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या; भावाचा आरोप, गुन्हा दाखल

नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला सरपंच झाल्यानंतर तिच्या घरातूनच तिचा छळ सुरु झाला. सासरच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला वैतागून महिलेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. भावाने दिलेल्या तक्रारीनंतर महिला सरपंचाच्या पतीसह सासरच्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

A woman sarpanch from Niphad in Nashik district has committed suicide
सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या
author img

By

Published : Nov 24, 2021, 9:44 AM IST

नाशिक - निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द येथील महिला सरपंच योगिता अनिल फापाळे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. योगिता यांच्या भावाचा आरोप आहे, की त्यांची बहीण योगिता या सरपंच झाल्यापासून सासरचे लोक त्यांचा छळ करत होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना काल रात्री घडली आहे.

भावाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
मयत महिला सरपंच योगिता फापाळे यांचे भाऊ संतोष शांताराम गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संतोष गवळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सरपंच झाल्या पासून माझ्या बहिणीचा तिच्या सासुरवाडीचे लोक छळ करत होते. तक्रारीत म्हटल्यानुसार, माझ्या बहिणीचा कोणत्याही कारणावरून वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. योगिताने सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची तक्रार गवळी यांनी केली आहे. सासरे बाबासाहेब फापाळे, पती अनिल बाबासाहेब फापाळे, सासु सरला फापाळे आणि दीर प्रदीप फापाळे (सर्व रा. मरळगोई खुर्द) या चौघांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात भा.द.वि. 306, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.