नाशिक : वाढदिवसाला घरी बोलून अल्पवयीन मुलीवर मित्रानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी संशयित युवका विरोधात पोस्को अंतर्गत अंबड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, पीडित मुलीने दिलेल्या तक्रारी वरून नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरात राहणार संशयित राजेशने (नाव बदलेले आहे) वाढदिवसानिमित्त पार्टी देण्यासाठी त्याच्या मैत्रिणीला घरी बोलवले होते.
मोबाईलमध्ये व्हिडीओ केल्याचा आरोप : घरात कुणीच नसल्याने संशयिताने मुलीवर अतिप्रसंग केला. या प्रसंगाचे मोबाईलमध्ये व्हिडीओ केला. मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर मुलगी घरी गेल्यावर तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला, तेव्हा घरच्यांनी तत्काळ अंबड पोलिसात धाव घेत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून संशयिता विरोधात पोस्को अंतर्गत ( बालकांचे अत्याचार पासून संरक्षण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
पार्टी देतो म्हणून बोलवले : माझी, संशयीताची ओळख काही महिन्यांपूर्वीची आहे. त्याचा वाढदिवस असल्याने मी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. वाढदिवसा निमित्ताने मी माझ्या घरी छोट्या पार्टीचे आयोजन केले असून तू पण ये अस त्याने मला सांगितले. मला वाटले पार्टी असल्याने त्यांच्या घरी त्याच्या घरचे, मित्र पण असतील. म्हणून मी घरी गेली घरी गेल्यावर लक्षात आले की घरात कोणीच नाही. अशात मी शुभेच्छा देऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला जवळ ओढत बळजबरी करून माझ्यावर अत्याचार केला. या सर्व प्रकारचे त्याने मोबाइलमध्ये चित्रण करून तू याबाबत कुठे सांगितले तर हा व्हिडीओ मी सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी दिली. मी घरी आल्यानंतर हा प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांना ही धक्का बसला. या नंतर आम्ही पोलीस ठाण्यात जाऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
आरोपी विरोधात गुन्हा दाखल : पीडितेच्या तक्रारीवरून आम्ही पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून संशयितालाता ब्यात घेतले आहे. याबाबत आम्ही तपास करत आहे. सध्या सोशल मीडियामुळे मुले, मुली लवकर जवळ येत असून यातून हे प्रकार घडत आहे. सोशल मीडियावर मैत्री करतांना मुलींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. लवकर कोणावर विश्वास ठेवू नये. आपला मित्र मैत्रीणी कोण आहे याबाबत घरच्यांना कल्पना देणे गरजेचे आहे. पालकांनी सुद्धा आपला मुलगा -मुलगी घराबाहेर त्याचे मित्र, मैत्रीणी कोण याची माहिती ठेवण गरजेचे आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महिलेचा विनयभंग : घरासमोर गाडी उभी करण्यास विरोध करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार सातपूर परिसरात घडला आहे. सातपूर पोलीस ठाण्यात संशयित कुणाल भदाणे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -