ETV Bharat / state

भाऊबीजेसाठी बहिण पाहत होती भावाची वाट; मात्र मिळाली त्याच्या हत्येची बातमी

भाऊबीजेच्या दिवशी बहिणीकडे जाण्यासाठी भाऊ घरून निघाला. बहिण त्याची वाट पाहत होती. मात्र, थोड्यावेळातच त्याची हत्या झाल्याची बातमी मिळाली. नाशकातील अंबड परिसरात ही घटना घडली.

मृत रमेश वानखेडे
author img

By

Published : Oct 30, 2019, 4:24 PM IST

नाशिक - भाऊबीजेसाठी मालेगाव येथे बहिणीकडे जाणाऱ्या भावाची हत्या झाल्याची घटना घडली. अज्ञात मारेकऱ्यांनी गळा आवळून आत्महत्या दाखवण्याचा बनाव केल्याचे शवविच्छेदनानंतर समोर आले आहे. याप्रकरणी नाशकातील अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश वानखेडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो अंबड परिसरातील आशीर्वाद नगर भागातील रहिवासी आहे. तो भाऊबीजेला जाण्यासाठी निघाला होता. त्याचा भाऊ अमृत देखील बहिणीकडे जाणार होता. त्यासाठी अमृतने त्याला फोन केला. मात्र, त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर बहिणीने फोन करून सांगितले की, रमेशला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमृत रुग्णालयात पोहोचतपर्यंत रमेशचा मृत्यू झाला होता.

जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारले असता ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी रमेशला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. यावेळी रमेशच्या पाठीवर जखमा होत्या. तसेच दोरीने गळा आवळ्याच्या व्रण होते. त्याच्या शर्टवर रक्ताचे डाग देखील दिसून आले. त्यानंतर त्याचे शवविच्छेदनात करण्यात आले. त्यामध्ये देखील रमेशची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने रमेशला रुग्णालयात दाखल कोणी केले? हे तपासण्यासाठी पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.

Intro:भाऊबीजीसाठी मालेगाव येथील बहिणीकडे जाणाऱ्या भावाची नाशिक मध्ये हत्या...

Body:भाऊबीजीला मालेगाव येथील बहिणीकडे जाणाऱ्या भावाची नाशिकमध्ये हत्या झाल्याची घटना घडली आहे..अंबड भागातील आशीर्वाद नगर भागात राहणाऱ्या रमेश वानखेडे या व्यक्तीची जबर मारहाण करून हत्या करण्यात आली,अज्ञात मारेकरांनी रमेश यांचा गळा आवळून आत्महत्या दाखवण्याचा बनाव केल्याचं रमेश यांच्या शवविच्छेदन मध्ये समोर आलं आहे...ह्या बाबत नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

मयत रमेश वानखेडे याचा भाऊ अमृत यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्याद म्हटले आहे की मी दरवर्षी मी आणि माझा लहान भाऊ आम्ही एकत्र मालेगाव येथे असलेल्या लहान बहिणीकडे जात असतो, यासाठी मी भाऊ रमेशला फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही, मला वाटले की तो मालेगाव येथे निघाला असावा म्हणून मी देखील माझी मोटरसायकल घेऊन मालेगावला निघालो,रस्त्यात मला माझ्या बहिणीचा फोन आला आणि तिने सांगितले कि रमेश याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले,

त्यामुळे मी लगेच काही वेळातच जिल्हा शासकीय रुग्णालयात पोचलो मात्र तोपर्यंत भाऊ रमेश यांची प्राणज्योत मावळली होती,
जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारले असता चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी रमेश याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगितले...ह्यावेळी रमेशच्या पाठीवरती जखमा होत्या तसेच गळा दोरीने आवळ्याच्या वन होते आणि त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग असल्याचे दिसून आले,शवविच्छेदनात देखील रमेशची हत्या झाल्याचे निष्पन्न झालं आहे...रमेश हा नाशिकच्या एका खाजगी कंपनीत वर्कर म्हणून काम करत होता,ह्याबाबत अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे... जिल्हा शासकीय रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने रमेश ला रुग्णालयात दाखल कोणी केलं हे तपासण्यात साठी पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या आहेत..

ह्या घटनेत पोलिसांन समोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे...
-शांत स्वभाव असलेल्या रमेश ची हत्या का झाली असावी?
-हत्या करून आत्महत्याचा बनाव का केला?
-रमेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करणारे कोण होते?
-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.