ETV Bharat / state

Loving Couple Suicide: प्रेमीयुगलाचा गोव्यात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न, मुलाचा मृत्यू; मुलगी सुखरूप - loving couple suicide in Goa

घरच्यांचा लग्नाला विरोध असल्या कारणाने नाशिक येथील एका प्रेमीयुगलाने गोव्यात एका हॉटेल मध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. (Loving Couple Suicide) त्यामध्ये मुलाचा मृत्यू झाला असून, मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Nov 3, 2022, 8:02 PM IST

नाशिक - नाशिक येथील गौरव यादव (21) या तरुणाचे एका तरुणीसोबत (22) प्रेमसंबंध होते. मात्र, लग्नाला दोघांच्या घरच्यांकडून तीव्र विरोध होता. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. (A loving couple from Nashik attempted suicide in Goa) त्यानुसार ते गेल्या आठवड्यात नाशिकहून रेल्वेने गोव्याला पळून गेले. मात्र, त्यांनी गोव्यात गेल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये मुलाचा मृत्यू झाला असून मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

गौरवचा उपचारादरम्यान मृत्यू - गोव्यात ते बनावट नावाने दक्षिण गोव्यातील कोलवा भागातील एका गेस्टवर थांबले होते. त्यानंतर त्यांनी 31 ऑक्टोबरच्या रात्री त्यांनी विषप्राशन करून आपली हा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बाब हॉटेल चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुसऱ्या दिवशी सायंकाळी गौरवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर मुलीची तब्येत स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

म्हणून केले विषप्राशन - आम्ही दोघे एकमेकांना खूप प्रेम करत होतो. आम्हाला लग्न करायचे होते. याची माहिती आम्ही घरच्यांना दिली होती. मात्र, घरच्यांचा लग्नाला प्रखर विरोध असल्याने आम्ही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आमच्यासमोर काही पर्याय नसल्याने आम्ही दोघांनी विष घेऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.