ETV Bharat / state

स्थायी समिती सभेत ठिय्या आंदोलन, नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

author img

By

Published : Sep 8, 2020, 6:50 PM IST

अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायम आहे, यावर अद्यापही महापालिकेच्यावतीने कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे, धनदांडग्यांच्या इमारती उभ्या राहताना सर्वसामान्यांना याचा त्रास का? असा पांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. पुढील सभेत यावर खुलासा झाला नाही, तर मनपासमोर आंदोलन करण्याचा इशारा कल्पना पांडे यांनी दिला आहे.

ठिय्या आंदोलन
ठिय्या आंदोलन

नाशिक - शहरात काही बांधकाम व्यावसायिकांनी नैसर्गिक नाल्यांवर नाधिकृतपणे बांधकाम करून इमारती उभारल्या आहेत. त्यामुळे, आता पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसत असल्याने या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेविका कल्पना पांडे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी थेट स्थायी समितीच्या सभेत ठिय्या आंदोलन केले असून यावर खुलासा मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला आहे.

माहिती देताना नगरसेविका कल्पना पांडे

आज नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेला अनेक नगरसेवकांनी ऑनलाइन हजेरी लावली, तर अनेकांनी प्रत्यक्ष सभेच्या दालनात उपस्थित राहण्यास पसंती दिली. विविध विकासकामांच्या विषयावर चर्चा सुरू असताना आपल्या प्रभागात अनेक नैसर्गिक नाले बुजवून त्यावर बांधकाम व्यावसायिकांनी इमारती बांधल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसत असल्याचे सांगत अशा बेकायदेशीर बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी पांडे यांनी केली.

तसेच, अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायम आहे, यावर अद्यापही महापालिकेच्यावतीने कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे, धनदांडग्यांच्या इमारती उभ्या राहताना सर्वसामान्यांना याचा त्रास का? असा पांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. पुढील सभेत यावर खुलासा झाला नाही, तर मनपासमोर आंदोलन करण्याचा इशारा कल्पना पांडे यांनी दिला आहे.

अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायम असल्याने संबंधित अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का? असा संतप्त सवाल देखील कल्पना पांडे यांनी सभेत उपस्थित केला. तसेच, अनेक वादग्रस्त विषय चर्चेत घेतले जात असताना नागरिकांच्या सोयीसाठी मांडण्यात आलेला प्रस्ताव गांभीर्याने घेतला जात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत आता निर्णय होऊन संबंधितांवर कारवाई होणार की, हा गदारोळ असाच सुरू राहणार हे बघणे महत्वाचे ठरेल.

हेही वाचा- नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपी मशीन बंदच...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.