नाशिक - जिल्ह्यात अवैद्य मद्य वाहतूक आणि विक्रीचे प्रमाण वाढल्याच्या चर्चा आहेत. त्यातच पुन्हा एकदा येवला तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 93 लाख रुपयांहून अधिक रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
गुरुवारी रात्री येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल याठिकाणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या बनावट मद्यसाठ्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. एक ट्रक नगरमार्गे मनमाडकडे संशयास्पदरित्या जात असल्याचे आढळून आले. दरम्यान पथकाने वाहन चालकाची विचारपूस करून वाहनाची झडती घेतली. त्यात विदेशी बनावटीचा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला 93 लाख 63 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा आढळून आला. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती अर्जुन ओहोळ विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी दिली आहे.
हेही वाचा - मराठा विकास प्राधिकरण स्थापनेच्या विरोधात कर्नाटक बंद; कन्नड संघटनांचा पुढाकार