ETV Bharat / state

धक्कादायक; नाशिक शहरात गेल्या चार महिन्यात 9 हजार 112 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jun 10, 2021, 9:11 AM IST

नाशिक शहरात मागील चार महिन्यात तब्बल 9 हजार 112 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहीती नाशिक महानगरपालिकेने राज्य शासनाला अहवालात पाठवल्याचे समोर आले आहे.

नाशिक शहरात गेल्या चार महिन्यात 9 हजार 112 जणांचा झाला मृत्यू

नाशिक - एप्रिल महिन्यात देशात सर्वधिक रुग्ण नाशिक जिल्ह्यात होते. या काळात जिल्ह्यात 45 हजार पेक्षाही अधिक ऍक्टिव्ह रुग्ण होते. अशा परिस्थितीत शहरात कोरोना उद्रेक झाला होता. अनेक ठिकाणी रूग्णांना बेड, ऑक्सिजन, इंन्जेक्शनची टंचाई होती, तर स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रीघ लागली होती.

मृतांची अधिकृत संख्या अद्यापही जाहीर केलेली नाही

अनेकदा प्रशासन मृतांचे आकडे लपवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. आता महापालिकेकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील चार महिन्यात नाशिक शहरात तब्बल 9 हजार 112 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचा अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. या अहवालानुसार मृत्युत 5,558 पुरुष, तर 3,554 महिला आहेत. मृतांचा आकडा अधिक आहे. मात्र असे असले तरी महानगरपालिकेने कोरोनामुळे मृत झालेल्या नागरिकांची अधिकृत संख्या अद्याप जाहीर केलेली नाही.

जानेवारी ते एप्रिल 2021 या कालावधी मध्ये 9 हजार 112 मृत्यु

गेल्या वर्षी कोरोनाने शहरात हाहाकार उडविला होता. डिसेंबर 2020 अखेर पर्यंत पहिली लाट ओसरली होती. जानेवारी 2021 मध्ये शहर कोरोना संकटातून बाहेर पडले होते. परंतु, त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अधिक तीव्रता धारण केली. त्यात विक्रमी रुग्ण संख्या नोंदविली गेली. एकट्या नाशिक शहारत लाखो जणांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे मृतांची संख्या देखील वाढली होती. मात्र किती रुग्ण कोरोनामुळे दगावले यासंदर्भातील आकडेवारी अद्यापही बाहेर आलेली नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शासनाला पाठविलेल्या आकडेवारीमध्ये एकुण मृतांचा आकडा प्राप्त झाले आहे. त्यात जानेवारी ते एप्रिल 2021 या कालावधी मध्ये 9 हजार 112 मृत्यु झाले. चार महिन्यातील आकडेवारीचा विचार करता त्यात सर्वाधिक कोरोना संसर्गाने रुग्ण मृत झाले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एप्रिलमध्ये सर्वाधिक मृत्यु

एप्रिल 2021 हा महिना नाशिक शहरासाठी सर्वाधिक जिवघेणा ठरला. या महिन्यात 2871 पुरुष व 2044 महिला असे एकुन ४९१५ मृत्यु झाले. चार महिन्यातील एकुण मृत्युंच्या तुलनेत साठ टक्के मृत्यु एकट्या एप्रिल महिन्यात झाले आहेत. दिवसाला 164 लोक मृत्युमुखी पडले आहेत.

३ विभागनिहाय चार महिन्यातील मृत्यु अहवाल

जानेवारी महिन्यात पुर्व विभागात एकुण 248 मृत्यु झाले. नाशिकरोड 118, सिडको 106, सातपूर 52, पश्‍चिम 480, पंचवटी 292 असे 1296 मृत्यु झाले. फेब्रुवारी महिन्यात पुर्व 222, पश्‍चिम 384, पंचवटी 234, नाशिकरोड 122, सिडको 190, सातपूर 48 असे 1200 मृत्यु झाले. मार्च महिन्यात पुर्व 350, पश्‍चिम 544, पंचवटी 353, नाशिक रोड 212, सिडको 169, सातपूर 73 असे 1707 मृत्यु झाले आहेत.

इतर कारणाने देखील मृत्यू

नाशिक शहराबरोबरच जिल्हा व जिल्हयाच्या बाहेर मिळुन 9 हजार 112 मृत्यू नोंदवले गेले आहेत. नाशिक शहर ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील 9112 मृत्यूंमध्ये 3,554 महिला व 5,558 पुरुष व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये कोरोनाबाधित रूग्णांसह अन्य सर्व कारणाने मयत झालेल्या व्यक्तींचाही त्यामध्ये समावेश आहे. शहरातील नाशिक पूर्व, पश्चिम, पंचवटी, नाशिक रोड, नवीन नाशिक, सातपूर या सहा विभागीय कार्यालयात मृत्यूंची नोंद असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.

हेही वाचा - #MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.