ETV Bharat / state

धक्कादायक..! कोरोना काळात घराबाहेर पडणाऱ्या आजोबाचा नातवाने केला खून

author img

By

Published : Oct 13, 2020, 7:58 PM IST

रागाच्या भरात माणूस काय करून बसेल सांगता येत नाही. आपल्या रागाचा परिणाम कुटुंबातील व्यक्तींनाही सहन करावा लागतो. नाशिकमध्ये रागाच्या भरात एका नातवाने आपल्या आजोबांचाच खून केला.

murder
खून

नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आजोबांना घराबाहेर जाण्यास नातवाने वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत बाहेर जाण्यापासून रोखले. त्यामुळे आजोबांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली. याचा राग धरून नातवाने आजोबांचा खून केला. त्यानंतर तोंडाला चिकटपट्टी लावत हातपाय बांधून मृतदेह एका नाल्यात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नातू किरण निवृत्ती बेंडकुळे (वय 23) याला अटक केली आहे.

धोंडेगाव येथे राहणाऱ्या रघुनाथ श्रावण बेंडकुळे (वय 70) यांचा नातू किरण याने खून केला. आजोबा वृद्ध असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते विनाकारण घराबाहेर किंवा मंदिरात जातात म्हणून त्यांना कित्येक दिवस नातू किरण हा लोखंडी साखळीने घरात बांधून ठेवत असल्याचे तपासात समोर आले आहे. नातवाच्या त्रासाला कंटाळून रघुनाथ यांनी हरसूल पोलीस ठाण्यात जाऊन महिनाभरापूर्वी तक्रार दिली होती. आजोबांनी तक्रार केल्याचा राग अनावर झाल्याने आरोपी किरण याने आजोबांच्या तोंडाला चिकटपट्टी लावत हातापायाला लोखंडी साखळी बांधून आडगाव शिवारातील नाल्यात फेकले.

दुसऱ्या दिवशी ओढाच्या नाल्यात एका वृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान खान यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार सुरेश नरवाडे, दशरथ पागी आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर हा प्रकार घातपाताचा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला व त्यांच्या तपासाला यश आले.

असा झाला खुनाचा उलगडा -

रघुनाथ बेंडकुळे यांचा खून केल्यानंतर नातू किरण याने त्यांचा मृतदेह नाल्यात फेकून दिला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर मृतदेहाचा फोटो काढून या व्यक्तीला कोणी ओळखते का याबाबत माहिती जमा करण्याचे काम सुरू केले. फोटो पाहिल्यानंतर एका जागरूक नागरिकाने मृत व्यक्ती ही धोंडेगाव येथील असून त्यांचा खून हा त्यांच्याच नातवाने केला असावा, अशी गोपनीय माहिती आडगाव पोलिसांना दिली. या माहितीनुसार पोलिसांनी संशयित आरोपी किरण याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने आजोबांचा खून केल्याची कबुली दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.