ETV Bharat / state

संतापजनक...अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार

author img

By

Published : Jan 19, 2020, 10:31 AM IST

पीडित मुलीने मागील वर्षी एका सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य केले होते. त्या कार्यक्रमाचे मोबाईलमध्ये शूटींग करून त्याची व्हिडिओ क्लिप राजूळे व रसूल या शिक्षकांनी तयार केली होती. त्यानंतर शिक्षकांनी सदर मुलीला तू केलेल्या नृत्याची क्लिप दाखवतो असे म्हणून तिला अश्लील क्लिप दाखविले व तिच्यावर अत्याचार केला.

nanded
प्रतिकात्मक

नांदेड- शंकरनगर येथील श्री. साईबाबा विद्यालयातील इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन दलित विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून मागील एका महिन्यांपासून वारंवार या मुलीवर बलात्कार व्हायचा. याप्रकरणी प्राचार्य शेळके, मुख्याध्यापक प्रदीप जाधव, शे.रसूल, दयानंद राजुळे व स्वयंपाकी सुरेखाबाई बनसोडे यांच्या विरोधात अ‌ॅट्रॉसिटी व अत्याचार प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीची प्रकृती मागील २० दिवसांपासून अतिषय गंभीर आसल्याने तिला आरोपी राजुळे व रसूल यांनीच नांदेड येथील खाजगी रुग्णालयात तिच्या आईच्या मदतीने दाखल केल्याचे सांगण्यात आले. या गंभीर प्रकरणातील सर्वच आरोपी फरार असून त्यांना अटक करण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक शिद्धेश्वर घुमाळ यांनी दिली आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला कलंकित करणाऱ्या या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून जनमानसातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शाळा हे शिक्षणाचे मंदिर असून जर त्याच ठिकानी मुली सुरक्षित नसतील तर पालकांनी विश्वास कोणावर ठेवावा हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

घटनेनंतर शाळेतील विद्यार्थी व पालक हादरले

वरील चौघांवर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच या बहुचर्चित शाळेत सन्नाटा पसरला असून विद्यार्थी व पालक पुरते हादरले आहेत. सदर संतापजनक अत्याचाराची घटना एका महिण्यापूर्वी घडलेली असतानाही याबाबत संबधित बलात्कारी शिक्षकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल न करता मुलीचा इलाज करा म्हणून पाठराखण करणारे संस्थेचे अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांची भूमिकाही बुचकळ्यात टाकणारी आहे. सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र भरांडे यांना ही भयानक घटना कळाल्यानंतर त्यांनी रामतिर्थ ठाण्याचे स.पो.नि सोमनाथ शिंदे यांना हा प्रकार शुक्रवारी रात्री कळविला. त्यानंतर भरांडे यांनी तातडीने मुलगी उपचार घेत असलेल्या नांदेड रुग्णालयाकडे धाव घेतली. मुलीच्या आई समोर पीडिताने तिच्यावर झालेला अन्याय कथन केल्यानंतर ही बाब वरिष्ठांना कळवित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नृत्याची क्लिप सांगून आरोपी दाखवायचे अश्लिल व्हिडिओ

पीडित मुलीने मागील वर्षी एका सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य केले होते. त्या कार्यक्रमाचे मोबाईलमध्ये शूटींग करून त्याची व्हिडिओ क्लिप राजूळे व रसूल या शिक्षकांनी तयार केली होती. त्यानंतर शिक्षकांनी सदर मुलीला तू केलेल्या नृत्याची क्लिप दाखवतो असे म्हणून तिला अश्लील क्लिप दाखविले व तिच्यावर अत्याचार केला. शाळेत मागील एका महिन्यापासून मुलीवर अत्याचार होत असल्याचे समजले आहे. वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे पीडित मुलीचे मानसिक संतुलनही बिघडले होते. या मुलीच्या वडिलांचे दोन-तीन वर्षापूर्वी निधन झाले. तिची आई मोलमजूरी करून मुलीला शिकवते. यातच शिक्षकांनी केलेल्या अत्याचारामुळे ती पार हादरून गेली आहे.

शाळेत यापूर्वी देखील घडल्या आहेत वादग्रस्त घटना; आर्थिक तडजोडीने प्रकरण दाबायचे

पीडित मुलगी शाळेत बेशुध्द होवून पडल्यानंतर तिला प्रथम स्थानीक व नंतर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनतर हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. मुख्याध्यापक प्रदीप जाधव यांनी याबाबत मुलीच्या आईची तक्रार घेवून संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्यापुढे उभे केले. या गंभीर प्रकरणाची व्याप्ती पहाता संस्थाचालकांनी तातडीने पोलिसात तक्रार देणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी ती दिली नाही. त्यामुळे, मुख्याध्यापक प्रदीप जाधव यांच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. शाळेत यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त घटना घडल्या आहेत. पण, त्यांची कुठेच वाच्यता न होवू देता आर्थिक तडजोडी करून प्रकरण दडपण्यात आल्याचे आता समोर आले आहे. या गंभीर प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून मुलीच्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार आसल्याचे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र भरांडे यांनी सांगितले.

हेही वाचा- ओल्या दुष्काळाचे अनुदान शासनाने त्वरीत द्यावे; भाजयुमोची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

Intro:नांदेड : अश्लील क्लिप दाखवून सहावीतील विद्यार्थिनींवर अत्याचार.
- साईबाबा विद्यालयातील शिक्षणक्षेत्राला काळिमा फासणारी घटना.
- प्राचार्यासह चौघांविरुद्ध गुन्हादाखल.

नांदेड : शंकरनगर येथील श्री साईबाबा विद्यालयातील इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन दलित विद्यार्थीनीवर मोबाईल मधील अश्लील व्हिडिओ दाखवून मागील एका महिन्यांपासून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी प्राचार्य शेळके, मुख्याध्यापक प्रदीप
जाधव, शे.रसूल, दयानंद राजुळे व स्वयंपाकी सुरेखाबाई बनसोडे यांच्या विरोधात अॅट्रोसीटी व अत्याचार प्रकरणी रामतिर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:पीडित मुलीची प्रकृती मागील वीस दिवसांपासून अतिषय गंभीर आसल्याने. तिला आरोपी राजुळे व रसूल यांनीच नांदेड येथील खाजगी रूग्णालयात तिच्या आईच्या मदतीने दाखल केल्याचे सांगण्यात आले.या गंभीर प्रकरणातील सर्वच आरोपी फरार असून त्यांना अटक करण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक शिध्देश्वर घुमाळ यांनी दिली. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला कलंकित करणाऱ्या या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून जनमानसात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.शाळा हे शिक्षणाचे मंदिर असून जर त्याच ठिकानी मुली सुरक्षित नसतील तर पालकांनी विश्वास कोणावर ठेवावा हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. वरील चौघांवर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच या बहुचर्चित शाळेत सन्नाटा पसरला असून विद्यार्थी व पालक पुरते हादरले आहेत. सदर संतापजनक अत्याचाराची घटना एका महिण्यापूर्वी घडलेली असतानाही याबाबत संबधित बलात्कारी शिक्षकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल न करता मुलीचा विलाज करा,म्हणून पाठराखण करणारे संस्थेचे अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांची भूमीकाही बुचकळ्यात टाकणारी आहे. सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र भरांडे यांना ही भयानक घटना कळाल्यानंतर त्यांनी रामतिर्थ ठाण्याचे सपोनि सोमनाथ शिंदे यांना हा प्रकार शुक्रवारी रात्री कळविताच त्यांनी तातडीने नांदेड येथील मुलगी उपचार घेत असलेले रूग्णालय गाठले.मुलीच्या आई समोर पिडीताने तिच्यावर झालेला अन्याय कथन केल्यानंतर ही बाब वरिष्ठांना
कळवित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पिडीत मुलीने मागील वर्षी एका सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य केले होते. त्या कार्यक्रमाचे मोबाईलमध्ये शूटिंग करून क्लिप राजूळे व रसूल या शिक्षकांनी तयार केली होती,सदर मुलीला तु केलेल्या नृत्याची क्लिप दाखवतो म्हणून अश्लील क्लिप
दाखवून तिच्यावर हा अत्याचार शाळेतच मागील एका महिन्यात पासून करण्यात आल्याचे सांगण्यात आले. वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे पिडीत मुलीचे मानसिक संतुलनही बिघडले होते. या मुलीच्या वडीलांचे दोन-तीन वर्षापूर्वी निधन झाले. तिची आई मोलमजूरी करून मुलीला शिकवते. यातच शिक्षकांनी केलेल्या अत्याचारामुळे ती पार हादरून गेली आहे.Conclusion:ही पिडीत मुलगी शाळेत बेशुध्द होवून पडल्यानंतर तिला प्रथम स्थानीक व नंतर नांदेड येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले आणि त्यांनतर हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. मुख्याध्यापक प्रदीप जाधव
यांनी या बाबत मुलीच्या आईची तक्रार घेवून संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्यापुढे उभे केले.
या गंभीर प्रकरणाची व्याप्ती पहाता संस्थाचालकांनी तातडीने पोलिसात तक्रार देणे गरजेचे असताना ती दिली नसल्याने मुख्याध्यापक प्रदीप जाधव यांच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.या शाळेत या पूर्वीही अनेक वादग्रस्त घटना घडल्या आहेत पण त्यांची कुठेच वाच्यता न होवू देता आर्थिक तडजोडी करून दडपण्यात आल्याचे आता
समोर आले आहे. या गंभीर प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करा, मुलीच्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार
आसल्याचे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र भरांडे यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.