ETV Bharat / state

धावती रेल्वे पकडताना वृद्ध महिलेचा गाडीखाली सापडून मृत्यू - woman died under railway

एलटीटी -भागलपूर ही धावती रेल्वे पकडताना एका 61 वर्षीय महिलेचा गाडीखाली येऊन मृत्यू झाला. मनमाड येथील रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

रेल्वे खाली मृत्यू
रेल्वे खाली मृत्यू
author img

By

Published : Jan 2, 2020, 9:28 AM IST

नाशिक - धावती रेल्वे पकडताना एका 61 वर्षीय महिलेचा गाडीखाली येऊन मृत्यू झाला. मनमाड येथील रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. सुशील चौधरी(चंदगड ,मध्यप्रदेश ) असे या महिलेचे नाव आहे. मध्यप्रदेशमधील बऱ्हाणपूरला जाण्यासाठी सुशील रेल्वे स्थानकात आल्या होत्या. एलटीटी -भागलपूर या गाडीने त्यांना जायचे होते. मात्र, येण्यास उशीर झाल्यामुळे चालू गाडी पकडण्यासाठी त्या पळत असताना त्यांचा पाय घसरून हा अपघात झाला.

वृद्ध महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू

हेही वाचा - पुणे मेट्रोचे प्रकल्प कामाला मोठे यश.. २५ दिवसात बोगदा केला पूर्ण, पाहा व्हिडिओ
सुशील मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेत. त्या शिर्डी येथील रुग्णालयात आल्या होत्या. रुग्णालयातील काम झाल्यानंतर त्या आपल्या घरी निघाल्या होत्या. मात्र, चालू गाडी पकडत असताना ही दुर्दैवी घटना घडली. रेल्वे स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. या प्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Intro:मनमाड:चालती गाडी पकडण्यासाठी पळत असतांना एका 61 वर्षीय महिलेचा गाडीखाली येऊन मृत्यू झाला असुन मध्यप्रदेश येथील बऱ्हाणपूरला जाण्यासाठी त्या मनमाड रेल्वे स्थानकात आल्या होत्या एलटीटी -भागलपूर या गाडीने त्यांना जायचे होते.परंतु येण्यास उशीर झाल्यामुळे चालू गाडी पकडण्यासाठी त्या पळत असताना त्यांचा पाय घसरून हा अपघात झाला.Body:मनमाड रेल्वे स्थानकावर चालती गाडी पकडतांना पाय घसरल्याने गाडी खाली येऊन 61 वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला ,सुशील चौधरी असे महिलेचे नाव असून त्या चंदगड ,मध्यप्रदेश येथील रहिवासी आहे शिर्डी येथील दवाखान्याच काम झाल्या नंतर बऱ्हाणपूर ला जाण्यासाठी त्या आपल्या भावा सोबत मनमाड रेल्वे स्थानकावर एल टी टी - भागलपुर एक्सप्रेस ने जाण्यासाठी आले असता गाडी चालू झाली होती चालू गाडी पकडत असतांना ही दुर्दैवी घटना घडली या प्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली.Conclusion:मनमाड रेल्वे स्थानकावर अनेक सुविधा उपलब्ध आहेत सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असुन वेळेवर गाडी पकडण्यासाठी न येता 10 मिनिटे आधी येऊन गाडी पकडावी जेणेकरून असे अपघात होणार नाही अशा सुचना रेल्वेच्या वतीने नेहमी देण्यात येतात मात्र नागरिक याकडे सरार्स दुर्लक्ष करत आहेत हे या घटनेमुळे समोर आले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.