नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या १२ तासांत ५० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडा ६०० वर पोहोचला असून चिंता व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये आणखी ४९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. एकट्या मालेगावातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९७ वर जाऊन पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच नाशिकच्या ग्रामीण भागात ६१, नाशिक शहरात ४५ कोरोनाचे रुग्ण असून आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६२२ वर पोहोचला आहे. त्यापैकी ४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
नाशिक ग्रामीणमधील कोरोनाबाधितांची आकडेवारी -
ठिकाण | कोरोनाबाधितांची संख्या |
नाशिक ग्रामीण | ०८ |
चांदवड | ०३ |
दिंडोरी | ०१ |
निफाड | ०४ |
नांदगाव | ०२ |
येवला | २५ |
सटाणा | ०१ |
मालेगाव ग्रामीण | ११ |