ETV Bharat / state

नाशिक विभागात ११ महिन्यात एसटीचे २३१ अपघात, ४९ जणांचा मृत्यू; एसटीचा प्रवास सुरक्षित?

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी गावाजवळ भरधाव वेगाने जाणारी बस रिक्षासह विहिरीत कोसळली होती. या अपघातात रिक्षातील प्रवाशांसह 26 जण मृत्युमुखी पडले. गेल्या वर्ष भराची आकडेवाडी पाहता नाशिक विभागात घडलेल्या बस अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्येच मोशीच्या अपघातातील 26 जणांची भर पडली. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या दीडशेच्या आसपास आहे. या आकडेवारीवरून एसटीच्या प्रवासावर नागरिकांना मधून प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

accident in nashik from last 11 months
एसटीचा प्रवास सुरक्षित?
author img

By

Published : Feb 4, 2020, 8:59 AM IST

Updated : Feb 4, 2020, 9:46 AM IST

नाशिक - विभागात गेल्या अकरा महिन्यामध्ये एसटी बसचे तब्बल २३१ अपघात झाले आहे. यामध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यादिवशी एसटी बस आणि रिक्षा विहिरीत कोसळून मोठा अपघात झाला. त्यामुळे सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाचा प्रवास असुरक्षित बनला का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करण्याची भीती वाटत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

एसटीचा प्रवास सुरक्षित?

शहर आणि ग्रामीण भागामधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एसटी बस हा प्रमुख घटक आहे. महामंडळाने बस सेवेचा चेहरा बदलण्याचा नेहमी प्रयत्न केला. मात्र, एसटी महामंडळ नेहमी तोट्यात चालताना पाहायला मिळते. आता खासगी बसचे आव्हान पेलताना एसटी महामंडळाची दमछाक होताना दिसते.

प्रवाशांच्या सेवेत हे एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. मात्र, एसटीचा प्रवास दिवसेंदिवस असुरक्षित होत चालला आहे. गेल्या अकरा महिन्यात नाशिक विभागात बसचे २३१ अपघात झाले. त्यामध्ये ४९ जणांना प्राण गमवावे लागले. हा नक्कीच चिंतेचा विषय आहे.

नाशिक एसटी-रिक्षा अपघात...वाचण्यासाठी इथं क्लिक करा...

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी गावाजवळ भरधाव वेगाने जाणारी बस रिक्षासह विहिरीत कोसळली होती. या अपघातात रिक्षातील प्रवाशांसह 26 जण मृत्युमुखी पडले. गेल्या वर्ष भराची आकडेवाडी पाहता नाशिक विभागात घडलेल्या बस अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्येच मोशीच्या अपघातातील 26 जणांची भर पडली. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या दीडशेच्या आसपास आहे. या आकडेवारीवरून एसटीच्या प्रवासावर नागरिकांना मधून प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

बस अपघाताची कारणे -

बसची देखभाल योग्यरित्या होत नसल्याच्या तक्रारी कर्मचारीच अनेकदा करीत असतात. त्यात अनेकदा नियमांचे पालन काही चालकांकडून होत नसल्याच्या तक्रारी येतात. महामार्गावर इतर वाहनांपुढे वेगाने दामटवण्याच्या बस पहिल्या तर मनात धडकी भरते. इच्छित ठिकाणी वेळेत पोहोचवण्याच्या घाईत अपघातांना आयते निमंत्रण मिळते. अपघात झाल्यास पर्यायी अपघातग्रस्तांना किंवा मृतांच्या नातेवाईकांना लाखो रुपयांची भरपाई दिली जाते. त्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागल्याचे दिसते. महामंडळ अनेकदा सुरक्षितता अभियान राबवते. मात्र, ही मोहीम कागदा पुरतीच मर्यादित राहिली की काय? अशी शंका प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील बस आगारानिहाय अपघात -
जानेवारी ते डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या अपघातांबद्दल एसटी महामंडळाने दिलेली आकडेवारी -

  • आगार अपघात
  1. नाशिक 1 - 7 मृत 25 गंभीर
  2. नाशिक 2 - 3 मृत 17 गंभीर
  3. मालेगाव - 2 मृत 8 गंभीर
  4. लासलगाव - 1 मृत 4 गंभीर
  5. कळवण - 3 मृत 8 गंभीर
  6. पेठ - 0 मृत 7 गंभीर
  7. येवला - 0 मृत 5 गंभीर
  8. पिंपळगाव - 0 मृत 5 गंभीर
  9. नांदगाव - 3 मृत 13 गंभीर
  10. सिन्नर - 0 मृत 5 गंभीर
  11. इगतपुरी - 1 मृत 5 गंभीर
  12. मनमाड - 1 मृत 8 गंभीर
  13. सटाणा - 2 मृत 13 गंभीर

वरील सर्व अपघातामध्ये एकूण 23 मृत 133 गंभीर झाले आहेत, तर 84 किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच जानेवारी 2020 मध्ये मालेगाव येथील देवळा येथे झालेल्या बस अपघातात सर्वाधिक 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

Intro:एसटीचा प्रवास आहे का सुरक्षित ? प्रवाशांच्या मनात शंका.
नाशिक विभागाता 11 महिन्यात बसचे तब्बल 231 अपघात,49 जणांचा मृत्यू..

Body:सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एस टी महामंडळाचा प्रवासची सेवा असुरक्षित बनली का? हा प्रश्न प्रवाशांच्या मनात आहे..नाशिक विभागात मागील अकरा महिन्यात एसटी बस चे तब्बल 231 अपघात झाले असून ह्यात 49 जणांचा मृत्यू झाला,
हा आकडा नक्कीच प्रवाशांना विचार करायला लावणारा आहे...

शहर आणि ग्रामीण भागामधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एस टी बस हा प्रमुख घटक,नेहमी तोट्यात चालणाऱ्या बस सेवेचा चेहरा बदलण्याचा अनेकदा प्रयत्न झाला,पण एसटी तोट्यातच राहिली.स्पर्धेच्या युगात खाजगी बसचं आव्हान पेलतांना एसटी महामंडळाची दमछाक होतेय..हे मात्र नक्की..
त्यात प्रवाशांच्या सेवेत हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी चा प्रवास दिवसेंदिवस असुरक्षित होतं चाललंय..याची कारणे एक ना अनेक असली तरी गेल्या अकरा महिन्यात नाशिक विभागात एसटी बसचे 231 अपघात झाले त्यात 49 जणांना आपले प्राण गमवावे लागले..ही लक्षणीय वाढ चिंतेचा विषय बनला आहे..
काही दिवसांपूर्वी नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या बस रिक्षा सह विहिरीत जाऊन कोसळली या अपघातात रिक्षातील प्रवाशांन सह 26 जण मृत्युमुखी पडले..गेल्या वर्ष भराची आकडेवाडी पाहता नाशिक विभागात घडलेल्या बस अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला अंक मोशीच्या अपघातातील 26 जणांची भर पडली.. तर गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या दीडशेच्या आसपास आहे..या आकडेवारी हुन एसटीच्या प्रवासावर नागरिकांना मधून प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे..

बस अपघातांना कारणं ही अनेक आहेत...
बसेसची देखभाल योग्यरित्या होत नसल्याच्या तक्रारी दस्तुरखुद्द कर्मचाऱ्यांन कडूनचं केल्या जातात.. त्यात अनेकदा नियमांचे पालन नही चालकांकडून होत नाही, महामार्गावर इतर वाहन पुढे वेगानं दामटवण्याच्या बस पहिल्या तर मनात धडकी भरते, इच्छित ठिकाणी वेळेत पोहोचवण्याच्या घाईत अपघातांना आयते निमंत्रण मिळते,अपघात झाल्यास पर्यायी अपघातग्रस्तांना किंवा मृतांच्या नातेवाईकांना लाखो रुपयांची भरपाई दिली जाते,त्यामुळे आधीच अत्यल्प उत्पन्न असल्याने एसटीला आणखीन तोटा सहन करावा लागतो, महामंडळ अनेकदा सुरक्षितता अभियान राबवते, मात्र ही मोहीम कागदा पुरतीच मर्यादित राहिली की काय अशी शंका आता प्रकर्षाने समोर आली आहे...

नाशिक जिल्ह्यातील बस आगारांनुसार अपघात
जानेवारी ते डिसेंबर 2019
नाशिक 1- 7 मृत 25 गंभीर
नाशिक 2- 3 मृत 17 गंभीर
मालेगाव - 2 मृत 8 गंभीर
लासलगाव- 1 मृत 4 गंभीर
कळवण- 3 मृत 8 गंभीर
पेठ- 0 मृत 7 गंभीर
येवला- 0 मृत 5 गंभीर
पिंपळगाव -0 मृत 5 गंभीर
नांदगाव 3 मृत 13 गंभीर
सिन्नर- 0 मृत 5 गंभीर
इगतपुरी- 1 मृत 5 गंभीर
मनमाड - 1 मृत 8 गंभीर
सटाणा 2 मृत 13 गंभीर
एकूण 23 मृत 133 गंभीर आणि सर्व अपघात मिळून 84 किरकोळ जखमी..

तर जानेवारी 2020 मध्ये मालेगाव येथील देवळा तेथे झालेल्या बस अपघातात सर्वाधिक 26 जणांचा मृत्यू झाला आहे..

फीड ftp
nsk bus accident story
रेडी टू एअर

Conclusion:
Last Updated : Feb 4, 2020, 9:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.