ETV Bharat / state

जागतिक परिचारिका दिन : 'एकीकडे आमचा सन्मान, तर दुसरीकडे पगार कपात' - Nashik District News

आज जगभरात जागतिक परिचारिका दिन साजरा केला जात आहे. ठिक-ठिकाणी आजच्या दिवशी परिचारिकांचा सन्मान केला जात आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या परिचारिकांच्या पगाराला कात्री लावत 40 टक्के कपात केली आहे.

Nashik
पूजा पवार
author img

By

Published : May 12, 2020, 7:31 PM IST

नाशिक - आज 12 मे ला जागतिक परिचारिका दिन हा सर्वत्र साजरा केला जात आहे. कोरोनाच्या काळात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच ठिकाणी परिचारिका आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून प्रत्येक सर्वसामन्य नागरिक करत आहेत. मात्र, असे असताना महाराष्ट्र राज्यात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या परिचारिकांच्या पगारात 40 टक्के कपात करण्यात आली आहे.

कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले असून भारत देशात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोनाच्या लढाईत आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर,परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत.

आज जगभरात जागतिक परिचारिका दिन साजरा केला जात आहे. ठिक-ठिकाणी आजच्या दिवशी परिचारिकांचा सन्मान केला जात आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या परिचारिकांच्या पगाराला कात्री लावत 40 टक्के कपात केली आहे.

सुरुवातीला या परिचारिकांना 45 हजार महिना मानधन देण्यात येत होते. ते आता 25 हजार रुपये दिले जात आहे. तसेच सुरुवातीला 11 महिन्याचा करारनामा केला जात होता. तो आता 6 महिन्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे परिचारिकांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजीची भावना आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.