नाशिक (येवला) - येवल्यात भीषण अपघात झाला. स्विफ्ट कारला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये 3 जण जागीच ठार तर अन्य 2 जण जखमी झाले आहेत. येवला-मनमाड रोडवर सावरगावजवळ हा अपघात झाला. धडक देणारा वाहनचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
असा झाला अपघात-
येवला-मनमाड महामार्गावरील सावरगाव गावाजवळील पुलाजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर हा अपघात झाला. स्विफ्ट कारला पाठीमागून येणार्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये स्विफ्ट कारमधील तीन जण जागीच ठार झाले. तर दोन जण जखमी झाले.
सजन संजय भड (25), ऋषिकेश अशोक भड (23) आणि राजेश ठोंबरे (36) हे तिघेजण ठार झाले. कारमध्ये पुढे बसलेले दोन जण हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
हेही वाचा- चंद्रकांत पाटील राज्यपालांना भेटायला गेले हे शंकास्पद- हसन मुश्रीफ
हेही वाचा- 'राग, द्वेष बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र या' विजयानंतर बायडेन यांचा संदेश