नाशिक - जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 268 रुग्ण आढळून आले असून आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 187 रुग्ण एकट्या नाशिक शहरातील आहेत.
नाशिकमध्ये झपाट्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून आतापर्यंत जिल्ह्यात 6409 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 306 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या नाशिकमध्ये बाधित रुग्णांची संख्या 3595 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 3836 जण कोरोना मुक्त झाले आहे, तर 2163 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.
नाशिक शहरात 277 प्रतिबंधित क्षेत्र असून सर्वाधिक रुग्ण पंचवटी, जुने नाशिक, नाशिक रोड, जेलरोड, देवळाली कॅम्प, सिडको, वडाळा, सातपूर या भागातील आहेत.
अॅक्टिव्ह रुग्ण -
नाशिक 72, चांदवड 12, सिन्नर 68, दिंडोरी 42, निफाड 72, नांदगाव 55, येवला 57, त्र्यंबकेश्वर 17, बागलाण 28, इगतपुरी 40, मालेगाव ग्रामीण 44, देवळा 27, पेठ 5, कळवण 5, एकूण ग्रामीण भागात 545 रुग्ण आहेत. मालेगाव शहरात 126 रुग्ण असून जिल्हा बाह्य रुग्णांची संख्या 27 इतकी आहे.