ETV Bharat / state

ह्रदयद्रावक : वाढदिवसादिवशीच काळाचा घाला; स्विमिंग पूलमध्ये पडून २ वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

author img

By

Published : Jul 19, 2022, 4:28 PM IST

Updated : Jul 19, 2022, 4:56 PM IST

लोणावळा जुळ्या मुलांचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी पवार कुटुंबीयांसह दहा ते बारा जण लोणावळ्याला गेले असता हा प्रकार घडला आहे. आई वडील आणि इतर कुटुंबीय चेकइन करण्यात व्यस्त असताना शिवबा हा लहान मुलगा खेळत खेळत स्विमिंग पूल मध्ये खेळण्या पकडण्यासाठी गेला. तेव्हा तो पडला. त्यात त्याचा दुर्देवाने मृत्यू झाला. मन हेलावून टाकणारा हा सगळा प्रकार या बंगल्याच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ( child death in fall swimming pool )

child death in fall swimming pool
वाढदिवसादिवशीच काळाचा घाला

नाशिक - जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नाशिकहून लाेणावळ्यात गेलेल्या कुटुंबातील दाेन वर्षांच्या चिमुकल्याचा स्विमिंग टँकमध्ये बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना ( child death in fall swimming pool ) घडली. ही घटना बुधवारी दि. १३ राेजी घडली असून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समाेर आले आहे.

स्विमिंग पूलमध्ये पडून २ वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

स्विमिंग पूलमधील खेळणी घेण्यासाठी गेलेल्या शिवबाचा गुदमरून मृत्यू - या घटनेमुळे नाशिक येथील पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवबा अखिल पवार (वय २, रा. पाथर्डी फाटा परिसर, नाशिक) असे मृत मुलाचे नाव आहे. लोणावळा जुळ्या मुलांचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी पवार कुटुंबीयांसह दहा ते बारा जण लोणावळ्याला गेले असता हा प्रकार घडला आहे. आई वडील आणि इतर कुटुंबीय चेकइन करण्यात व्यस्त असताना शिवबा हा लहान मुलगा खेळत खेळत स्विमिंग पूल मध्ये खेळण्या पकडण्यासाठी गेला. तेव्हा तो पडला. त्यात त्याचा दुर्देवाने मृत्यू झाला. मन हेलावून टाकणारा हा सगळा प्रकार या बंगल्याच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, ही घटना बंगल्याच्या केअर टेकर आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप मृत मुलाच्या वडिलांनी केला आहे. मुलाच्या आईने आपली मुले जोपर्यंत समजदार होत नाही. तोपर्यंत त्यांना अशा ठिकाणी घेऊन जाऊ नये, असा आवहान मृत मुलाच्या आईने केले आहे.

आनंदावर विरजन - नाशिकचे पवार कुटुंबीय जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा होणार या अपेक्षेने आनंदित होते. एकीकडे वाढदिवस म्हणजे प्रत्येकासाठी एक खास दिवस असतो. कुटुंबीय, मित्र आणि आप्तेष्ट यांच्या प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव झेलण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस. मात्र या आनंदाच्या दिवशीच पवार कुटुंबियांच्या एका मुलावर काळाने घाला घातल्याने पवार कुटुबींयावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा - Pak Infiltrator : नूपुर शर्माच्या हत्येसाठी पाकिस्तानातून आला घुसखोर.. सीमा ओलांडली अन् बीएसएफच्या जवानांनीं मुसक्या आवळल्या

Last Updated : Jul 19, 2022, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.