ETV Bharat / state

नाशकात ११ महिन्याच्या चिमुकल्याचा बादलीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

अवघ्या ११ महिन्याच्या तन्मयचा पाण्याच्या बादलीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तन्मय
author img

By

Published : Aug 12, 2019, 7:08 PM IST

नाशिक - पंचवटीतील मोरे मळा परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अवघ्या ११ महिन्याच्या लहान बालकाचा पाण्याच्या बादलीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तन्मय भोये असे या लहान बाळाचे नाव आहे.

नाशकात लहान बाळाचा दुर्दैवी मृत्यू

रविवारी तन्मय घरात झोपलेला होता. यामुळे तन्मयच्या आईने काही लहान मुलांना तन्मयवर लक्ष ठेवायला सांगितले आणि ती दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी गेली. दरम्यान, झोपलेला तन्मय जागा झाला आणि रांगत रांगत प्रसाधन गृहाकडे गेला. प्रसाधन गृहाजवळ एक पाण्याची बादली भरलेली होती. या बादलीच्या आधाराने तन्मय उभा राहिली आणि तोल जावून पाण्याच्या बादलीत पडला. दरम्यान लक्ष ठेवायला सांगितलेली मुले टीव्ही बघण्यात गुंग झाल्यामुळे त्यांचे तन्मयकडे लक्षच गेले नाही. भोये कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ तन्मयला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी नाका तोंडात पाणी जाऊन श्वास गुदरमल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना पालकांच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे सांगत पालकांनी लहान मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Intro:नाशिकच्या पंचवटी मधील मोरे मळा परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आलीये..अवघ्या ११ महिन्याच्या लहान बाळाचा पाण्याच्या बादलीत पडून दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे परिसरात आता हळहळ व्यक्त होतीये...
Body: लहान बाळाच्या अचानक जाण्यानं अनेकांची मन हेलावली आहेत.. काल घरात इकडे तिकडे रांगत फिरणारा तन्मय आज अचानक घर सोडून गेलाय त्यामुळे घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय..तन्मय काल झोपी गेला असताना आई दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती..दोन लहान मुलांना बाळावर लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं मात्र ही दोन्ही मूल टीव्ही बघत बसली...आणि त्यातच ती रमून गेली...झोपलेला तन्मय उठला आणि बाथरुमकडे रांगत रांगत खेळत गेला.. मात्र बाथरूममध्य एक पाण्याची बादली भरलेली होती त्याच बादलीचा आधार घेत तन्मय उभा राहिला आणि त्याचा तोल जाऊन तो बादलीत खाली डोके व वर पाय या अवस्थेत पडला. नाका तोंडात पाणी जाऊन त्याचा श्वास कोंडला गेला. ही बाब निदर्शनास येताच भोये कुटुंबीयांनी त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तन्मयला मृत घोषित केले. Conclusion:या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे..ही घटना पालकांच्या निष्काळजीपणामुळेच घडल्याचं दिसून येतंय मात्र पालकांनी अशा लहान मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे..तसेच पालकांनी लहान मुलांना घरात एकट सोडून कुठेही जाऊ नये असं आव्हान पोलिसांकडून करण्यात येत आहे

बाईट : के.डी पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी)
पालकांच्या निष्काळजी पणामुळे अनेक लहान बालकांचा मृत्यू झालाय त्यामुळे आता पालकांनी लहान मुलाकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवल पाहिजे तेव्हाच अशा घटनांना कुठेतरी आळा बसेल..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.