नंदुरबार - महाराष्ट्राच्या मातीची शपथ घेवून सांगतो आदिवासींच्या आरक्षणाला, हक्काला एक कणही धक्का लागु देणार नाही, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे दिली. जिल्ह्यातील धडगाव येथे शिवसेनेचे उमेदवार आमश्या फुलजी पाडवी यांच्या प्रचारासाठी ते आले होते.
हेही वाचा - 352 सखी मतदार केंद्र, चालणार महिला राज !
यावेळी ते म्हणाले, की धनगरांचे आरक्षण त्यांचा हक्क आहे. मात्र, ते देताना आम्ही आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही. तसेच अशा प्रकार अपप्रचार करणाऱ्या आघाडीला आडे हात घेतले आहे. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात रोजगाराची संधी नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणत स्थलातंर होते. अशा मोठ्या अडचणींनी खडतर आयुष्य जगत असणाऱया आदिवासींचे आरक्षणाने जे त्यांना मिळत आहे ते काढून घेणारी औलाद सेना- भाजपची नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
हेही वाचा - औरंगाबादेत रिक्षा अन् दुचाकीच्या अपघातात २ ठार, ४ जखमी
अक्कलकुवामध्ये कुपोषणाबाबत भरपूर एकल आहे. येथे पुन्हा सेना भाजपचे मजबूत सरकार आल्यानंतर कुपोषण राहणार नाही तसेच दहा रुपयात जेवण ही शिवसेनेने जाहीर केलेली योजना कुपोषण मुक्तीसाठी मदतगार ठरणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच याआधी नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरील गावांच्या आरोग्यासाठी आम्ही 3 बोट, रुग्णवाहिका दिल्या आहेत. यापुढे वाड्या-पाड्यावरुन रुग्ण वाहन्यासाठी बाईक अँम्बुलन्स देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.