नंदुरबार : नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा मतदानाला सुरुवात झाली (Dokare tribal cooperative sugar factory election) आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कारखाना स्थापनेपासून पाच वेळा बिनविरोध झाली होती. मात्र आता सहावी पंचवार्षिकची निवडणूकीत मतदान होता (Sugar Factory Election Voting) आहे. १७ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या आहेत. १५ जागेंसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस व भाजपाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरस :आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली भरत माणिकराव गावित निवडणुकीत लढवित असल्याने दोन गावीत परिवार एकत्रित आले (cooperative sugar factory election started) आहे. त्यांचे परिवर्तन पॅनलने निवडणुकीत कंबर कसली (Sugar Factory Election) होती. तर सत्ताधारी माजीमंत्री सुरूपसिंग नाईक यांचे पुत्र आमदार तथा कारखान्याचे चेअरमन शिरीषकुमार नाईक यांनी सर्व ताकद लावून सत्ता कायम राहण्यासाठी कसून प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीत गावित आणि नाईक परिवार आमने-सामने उभे असून सत्ता कोण काबीज करते ? याकडे सर्वांचे लक्ष लागून (sugar factory election started in Navapur) आहे.