ETV Bharat / state

Nandurbar Grampanchayat Election : नंदुरबार जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींसाठी मतदान - Grampanchayat Election

जिल्ह्यात एकूण 412 मतदान केंद्रे आहेत. (Nandurbar Grampanchayat Election). यात चार मतदान अधिकारी, कर्मचारी तर दोन पोलीस कर्मचारी अश्या 6 जणांचा समावेश आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्ह्यात पोलीस दलातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Voting for 123 Grampanchayat in Nandurbar).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 18, 2022, 3:20 PM IST

नंदुरबार

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. (Nandurbar Grampanchayat Election). यातील 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून आज 117 ग्रामपंचायतीसाठी 412 मतदान केंद्रावर मतदान पार पडते आहे. (Voting for 123 Grampanchayat in Nandurbar). यात लोकनियुक्त सरपंच पदासाठी 394 तर सदस्य पदासाठी 2 हजार 454 उमेदवारांसाठी 1 लाख 83 हजार 386 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रशासनातर्फे निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली असून आज प्रत्येक तालुक्यातील तहसिल कार्यालयामधून मतदार कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत.

मतदान यंत्रात बिघाड : नंदुरबार तालुक्यातील धानोराच्या 04 नंबर बुथ मधील मशीन मध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेत खोळंबा आला आहे. मशीनच्या केबल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मशीन बंद पडले असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात नवीन मशीन घेऊन मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 412 मतदान केंद्रे आहेत. यात चार मतदान अधिकारी, कर्मचारी तर दोन पोलीस कर्मचारी अश्या 6 जणांचा समावेश आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्ह्यात पोलीस दलातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अक्कलकुवा तालुका : जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अक्कलकुवा, खापर, पोरांबी, डेब्रामाळ, कुकडीपादर, डनेल, मनीबेली, मोलगी, भगदरी, भाबलपुर, घंटाणी, विरपुर, सोरापाडा, अलीविहिर, बिजरीगव्हाण, खटकुणा, टावली, मंडारा, खाई, कौलीमाळ, कंकाळमाळ, कुवा, बेडाकुंड, बोखाडी, वडीबार, ओहवा, वेली, उमरगव्हाण, चिवलउतार, माळ या 30 ग्रामपंचायतींसाठी 119 मतदान केंद्रे असून यात 29 हजार 256 महिला मतदार व 29 हजार 896 पुरूष मतदार आहेत. इतर 1 मतदार मिळून एकूण 59 हजार 153 मतदार आहेत. या ग्रामपंचायतीतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी 107 तर सदस्य पदासाठी 724 उमेदवार रिंगणात आहेत.

अक्राणी तालुका : अक्राणी तालुक्यातील मांडवी बु. मक्तारझिरा,मांडवी खु, वावी, जुगणी, भमाणे, भाबर, उडद्या, राजबर्डी, कुवरखेत, कात्रा, तेलखेडी, कुकलट, शेलकुई, वलवाल, केलापाणी, खडकी,फलाई, भादल, कुंडया, रोषमाळ खुर्द, कुंभरी, थुवाणी, डुडल, कुकतार, डोमखेडी, गेंदा, माळ, खुटवाडा, पिपंपळबारी, चांदसैली, बिजरी, गोया, कामोद खु., चिखली, बिलगांव, त्रिशुल या 44 ग्रामपंचायतीसाठी 139 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून यात 25 हजार 128 महिला व 25 हजार 910 पुरुष असे एकूण 51 हजार 38 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या 44 ग्रामपंचायतीतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी 146 तर सदस्य पदासाठी 854 सदस्य रिंगणात उभे आहेत.

तळोदा तालुका : तळोदा तालुक्यातील उकमेव राजविहिर ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून येथे 3 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. यात 911 महिला तर 845 पुरूष असे एकूण 1 हजार 756 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. येथे लोकनियुक्त सरपंच पदासाठी दोन तर सदस्य पदासाठी 18 सदस्य आहेत.

शहादा तालुका : शहादा तालुक्यातील कळंबू, खैरवे, निंभोरा, बहिरपूर, बिलाडतर्फे हवेली, म्हसावद, धांद्रे बु., पाडळदे बु., कलमाडीतर्फे बोरद, जीवनगर या 10 ग्रामपंचायतीसाठी 40 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून 9 हजार 579 महिला तर 9 हजार 864 पुरूष असे एकूण 19 हजार 443 मतदार आहेत. या 10 ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी 39 तर सदस्य पदासाठी 166 उमेदवार रिंगणात आहेत.

नवापूर तालुका : नवापूर तालुक्यातील शेई, भांगरपाडा, नानगीपाडा, अंठीपाडा, खडकी, वन्हाडीपाडा, शेगवे, विसरवाडी, खेकडा, वाटवी, वावडी, करंजवेल, वाटवी (नवनिर्मित), पाटी बेडकी या 15 ग्रामपंचायतीसाठी 52 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून 11 हजार 705 महिला व 11 हजार 220 पुरूष असे एकूण 22 हजार 925 मतदार मतदान करणार आहेत. या 15 ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी 53 तर सदस्य पदासाठी 374 उमेदवार रिंगणात आहेत.

नंदुरबार तालुका : नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे, रनाळे, तलवाडे बु., रजाळे, आसाणे, घोटाणे, ओसर्ली, सातुर्खे, खैराळे, कोठडे, धानोरा, करणखेडा, तिसी, अमळथे, चौपाळे, राकसवाडे, घुली या 17 ग्रामपंचायतीसाठी 59 मतदान केंद्र असून 14 हजार 557 महिला तर 14 हजार 5114 पुरूष मतदार असे एकूण 29 हजार 71 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या 17 ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी 47 तर सदस्य पदासाठी 318 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील 117 ग्रामपंचायतींसाठी 412 मतदान केंद्रावर लोकनियुक्त सरपंचपदाचे 394 तर सदस्य पदाचे 2 हजार 429 उमेदवारांचे भवितव्य 1 लाख 86 हजार 386 मतदार ठरविणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.