नंदुरबार - शहरात जिल्हा प्रशासनाने ७ हजारांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने मतदान जनजागृती कार्यक्रम राबिवण्यात आला. यावेळी मानवी साखळीद्वारे निवडणूक आयोगाचा मतदान जनजागृतीचा लोगो तयार करण्यात आला.
हे वाचलं का? - सायकल रॅलीद्वारे हिंगोलीत मतदान जनजागृती
शहरातील जीटीपी महाविद्यालयाच्या प्राणंगणात 12 शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात गडचिरोलीनंतर मतदानात नंदुरबारने दुसरा क्रमांक गाठला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या मतदानाची टक्केवारी क्रमांक 1 वर नेण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. त्यासाठी मतदान जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहे. त्याच अनुषंगाने ही मानव साखळीची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा, वसुमना पंत यांनी आकाशात फुगे सोडून या कार्यक्रमाचे औपचारीक उद्घाटन देखील केले.