नंदुरबार - महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या शहादा तालुक्यातील असलोद काही दिवसांपूर्वी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, गावात बिअर शॉपी सुरू झाली आहे. दारूबंदी असतानाही बिअर शॉपीचा परवाना मिळालाच कसा, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. अवैध धंदे बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कठोर पाऊल उचलावीत, ग्रामस्थांची मागणी
असलोद गावातील दारूबंदीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याबरोबरच गावातील बेकायदेशीर धंदे बंद करण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी शहादा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
विभागीय पथकाकडून कारवाई
गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत गावातील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने काही नागरिकांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावरून काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयातील पथकाने असलोद गावात मोठी कारवाई गावात केली होती.
हेही वाचा - केंद्राचा कृषी विधेयकाच्या विरोधात वंचित आघाडीचे धरणे आंदोलन
हेही वाचा - नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद