ETV Bharat / state

गुजरातमध्ये अवैधरित्या दारुची वाहतूक करणारे वाहन जप्त, साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत - nandurbar local crime branch

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर-खेकडा मार्गावरील झामणझर शिवारात खडी क्रेशरजवळ पोलिसांनी अवैध दारूची तस्करी करणारे वाहन पकडले असून चार लाख 76 हजाराचा अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. वाहन चालकालाही अटक करण्यात आली आहे.

vehicles-transporting-liquor-illegally-seized-in-rs-4-dot-5-lakh-seized
गुजरातमध्ये अवैधरित्या दारुची वाहतूक करणारे वाहन जप्त, साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत
author img

By

Published : Jul 6, 2020, 11:30 AM IST

गुजरातमध्ये अवैधरित्या दारु घेऊन जाणारे वाहन जप्त, साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नंदुरबार - जिल्ह्यातील नवापूर खेकडा मार्गावरील झामणझर शिवारात खडी क्रेशरजवळ पोलिसांनी अवैध दारूची तस्करी करणारे वाहन पकडले असून चार लाख 76 हजाराचा अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. वाहन चालकालाही अटक करण्यात आली आहे.

गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने महाराष्ट्रातून विविध मार्गाने दारूची अवैध वाहतूक केली जात आहे. अशाप्रकारे रविवारी अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. इनोव्हा गाडी क्र. जी. जे. 05 - सी. एल. 5526 या वाहनात राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरुन गुजरातमधील वडोदरा-सुरत येथे वाहतुक केली जात होती. याबद्दल माहीती मिळताच वाहनाचा पाठलाग केला. दरम्यान, चालकाला वाहनाबाबत विचारणा केली असता त्याने उडवा-उडवीचे उत्तर दिली. सदर वाहनाचा संशय आल्याने तपासणी केली असता अवैध दारू दिसून आली. गाडीत पांढऱ्या रंगाच्या प्लास्टीक पिशवीमध्ये विदेशी दारुचे प्लास्टीक बॉटल मिळून आले. तसेच, विदेशी दारुच्या परमिट बाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतेही परमिट किंवा वाहतुकीचा परवाना नव्हता. तपासणी केली असता गाडीत विदेशी दारुच्या बाटल्या आढळुन आल्या. दरम्यान, पोलीसांनी गाडीसह चार लाख 73 हजाराचा माल जप्त केला आहे. तर, चालक मोहसिन उर्फ मुन्ना अब्दुल कादर मावत (वय-३४) वर्ष, रा.घर क्र. २०५, आशियाना कॉम्पेक्स, मोठा वराछा रोड, सुरत (गुजरात) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

हेही वाचा - चिमूर तालुक्यात दारू विक्रेत्यावर कारवाई; साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.