नंदुरबार - आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - #Video: धक्कादायक.. पाण्याच्या टाकीवरुन उडी मारुन केली आत्महत्या
तोरणमाळ येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते. या यात्रोत्सवासाठी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर येत असतात. तोरणमाळ येथे जाताना सात पायरी घाटात नागार्जून मंदिराजवळ चारचाकी वाहनाच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी 30 फूट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. अपघातातील मृत आणि जखमी धुळे जाते जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रहिवाशी आहेत. दरम्यान, जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.