ETV Bharat / state

Tough journey of Vaccination : डोंगराळ, अतिदुर्गम भागातील लसीकरणाचा खडतर प्रवास - tough journey of Corona vaccination

नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा किनाऱ्यांवर असणारे वाडे-पाडे गाठण्यासाठी जीप, बोट ॲम्बुलन्स (तरंगता दवाखाना) आणि त्यांनतरही पायपीट करुन लोकांच्या घरापर्यंत जावुन अतिदुर्गम भागातील लसीकरणाचा खडतर प्रवास ( Vaccination in remote areas of Nandurbar ) करणाऱ्या या साऱ्या यंत्रनेला प्रोत्साहनासाठी हा खास विशेष वृत्तांत....

Tough journey of Vaccination
अतिदुर्गम भागातील लसीकरणाचा खडतर प्रवास
author img

By

Published : Nov 29, 2021, 7:51 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये चौकाचौकात कोरोना प्रतिबंधक लस अगदी सहज उपलब्ध आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील नर्मदा काठच्या दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी गाव पाड्यांवर लसीकरणासाठी ( Vaccination in remote areas of Nandurbar ) काय मेहनत घ्यावी लागती. नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा किनाऱ्यांवर असणारे वाडे-पाडे गाठण्यासाठी जीप, बोट ॲम्बुलन्स (तरंगता दवाखाना) आणि त्यांनतरही पायपीट करुन लोकांच्या घरापर्यत जावुन अतिदुर्गम भागातील लसीकरणाचा खडतर प्रवास करणाऱ्या या साऱ्या यंत्रनेला प्रोत्साहनासाठी हा खास विशेष वृत्तांत....

प्रतिक्रिया

लसीकरणासाठी विशेष प्रयत्न -

अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील बहुमतांशी भाग हा दुर्गम व अतिदुर्गम आहे. डोंगराळ भाग व नर्मदा नदीमुळे या भागात रस्ते व दळणवळणाची साधने नसल्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण ( Vaccination in remote areas of Akkalkuwa ) करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. परिणामी लसीकरणाचे प्रमाण कमी होते. मात्र या अडचणीवर मात करीत जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग बोट ॲम्बुलंसचा (तरंगते दवाखाने) वापर करून लसीकरण मोहीम राबवीत आहे. डोंगर-दऱ्यातील उपलब्ध रस्त्यांवर वाहनाद्वारे खडतर प्रवास करीत वैद्यकीय पथक नर्मदा नदीच्या काठा पर्यंत जात असून, पुढचा प्रवास बोट ॲम्बुलंसने करून नर्मदा नदी व त्याच्या बॅक वॉटर ने वेढलेल्या गाव- पाड्यांच्या घरा-घरा पर्यंत पोहोचत आहे. दुर्गम पाड्यांवर लसीकरण शिबिरांचे आयोजन करून लाभार्थींना बोट ॲम्बुलसने शिबिरापर्यंत आणले जात आहे. तर बहुतांशी घरा घरात जाऊन लसीकरण केले जात आहे. या बोट ॲम्बुलसमध्येही लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. काठावरील ग्रामस्थ या केंद्रातूनही लसीकरण करून घेत आहेत. या भागातील आशा वर्कर यासाठी विशेष प्रयत्न करीत असून छोट्या बोटीतून लाभार्थींना त्या बोट ॲम्बुलस व शिबिरापर्यंत आणून त्यांना लसीचे डोस देण्यात येत आहे.

tough journey of Corona vaccination
लसीकरणाला जाताना अधिकारी

असा होता दुर्गम भागातील लसीकरणाचा प्रवास -

नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यात अतिदुर्गम भागात वसलेले हे आहे जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्र. प्राथमिक आरोग्य केंद्रातुन निघणार हा आरोग्य कर्मचारी यांची हि टिम जात आहे ती अतिदुर्गम भाग असणाऱ्या नर्मदा काठावरील वाड्या पाड्यांवर लसीकरणासाठी, सुरुवातीला डोंगरदऱ्यातून अतीशय चिंचोळ्या आणि जीवघेण्या घाट रस्तांमधुन अशा पद्धतीने गाडीतुन तब्बल दहा ते 12 किलो मीटरचा प्रवास करुन आरोग्य विभागाची टिम पोहचली आहे. नर्मदा किनारी वसलेल्या चिमलखेडी गावात, मग येथुन सुरू होतो तो तंरगता दवाखाना अर्थात बोट ॲम्ब्युलंन्सचा प्रवास. सर्व आरोग्याच पथक, तरंगत्या दवाख्यान्यातील तैणात आरोग्य पथक, आशा अंगणवाडी सेविका हे मग नर्मदा किनाऱ्यांवर वस्ती असलेल्या वाड्या पाड्यावर लसीकरणासाठी अनेक किलोमीटरचा बोटीने प्रवास करुन गाठता तो नर्मदा किनारा, मग किनाऱ्यापासून डोंगरावर दुरवर वसलेल्या गावांपर्यंत पायपीट करुन मग सुरु होते ती "हर घर दस्तक लसीकरण अभियान". या मोहीमेत काही पाड्यांवर एकाच ठिकाणी बसुन त्या ठिकाणच्या लाभार्थ्याना एकत्र आणुन लसीकरण केले जाते. तर कुठे घराघरापर्यत पोहचुन प्रत्येक लाभार्थ्यांला लस दिल्या जात आहे. दुसरीकडे आदिवासी बांधवामध्ये लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजातुन या लसीकरण पथकाला मोठा विरोधही सहन करावा लागत आहे. मात्र स्थानिकांच्या मदतीने हे काम शक्य होत असल्याच पथकातील वैद्यकीय अधिकारी सांगतात.

Tough journey of Vaccination
लसीकरणाला जाताना अधिकारी

आशा वर्करांचे ध्येय 100% वाड्या पाड्यांमध्ये लसीकरण -

या साऱ्या मोहीमेत अंगणवाडी सेविका आणि आशाताई यांची भुमिका तर मोलाची, अशाच एका पाड्यावर स्वतः डुगी (छोटी बोट) चालवत लाभार्थ्यांना तरंगत्या दवाखान्यापर्यत लसीकरणासाठी घेवुन येणाऱ्या आशाताई संगीता वसावे दिसल्यात. तरंगता दवाखाना एका ठिकाणी उभा राहील्यानंतर नजीकरच्या डोगर दऱ्यावर राहणाऱ्या आदिवासी बांधवाना त्या दवाखान्यापर्यत पोहचण्यासाठी रस्त्याच नसल्याने आपल्या गावातल्या डुगीतून त्यांनी लसीकरणासाठी आणण्याच काम या आशाताई करत होत्या. कधी हवा जास्त असली तर डुगी पलटण्याची ही भिती मनात असते. मात्र आपल्या वाड्या पाड्याला शंभर टक्के लसीकरण करण्याची जिद्द असल्याने आपल्याला होत असलेली मेहनत आणि त्रास या जिद्दीपुढे काहीही नसल्याच आशाताई संगिता वसावे आवर्जुन सांगतात.

दुर्गम भागात लसीकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते पुढे आले -

चिमलखेडी सारख्या आदिवासी बहुल भागात सुरुवातीच्या काळात लसीकरणासाठी मोठा विरोध देखील होता. लस घेतल्यानंतर काहीतरी होत अशी अफवा असल्याने लोक लसीकरणासाठी अनेकदा आलेच नाही. मग काही सामाजीक कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध असतांना देखील लस टोचली आणि ते सुखरुप असल्याचे निदर्शानास आल्यानंतर आता त्या वाड्या वस्तातील लोक देखील लसीकरणासाठी पुढे येत आहे. विशेष म्हणजे घरादारा पर्यत मोठी मेहनत घेत आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी येत असल्याने युवकांमध्ये देखील लसीकरणासाठीचा उत्साह दिसुन येतो.

ग्रामीण लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न -

राज्यात सर्वात कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबारचे नाव अग्रक्रमावर आहे. खडतर भौगिलीक परिस्थीती, स्थलांतर, आदिवासी बांधवांमध्ये लसीकरणाबाबतचा गैरसमज अशी विविध कारण त्यासाठी कारणीभुत आहेतच. मात्र हि ओळख पुसुन काढुन जिल्ह्यातल्या प्रत्येक आदिवासी बांधवांपर्यत लसीकरणासाठी पोहचण्याची आरोग्य यंत्रनेसह, शिक्षक, आशा अंगणवाडी सेविकांची मेहनत खऱया अर्थाने प्रशंसनिय आहे. जर दऱ्याखोऱ्यात वसलेल्या आदिवासी बांधवाला लस मिळवण्यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागत असेल तर शहरी भागात अतिशय सोप्या पद्धतीने उपलब्ध होणारी लस टोचुन घेण्यासाठी मग नागरीक का पुढाकार घेत नाही असाच प्रश्न पुढे येत आहे.

हेही वाचा - vaccination certificates compulsory for Best : बेस्ट प्रवासाकरिता दोन लशींचे प्रमाणपत्र बंधनकारक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.