नंदुरबार - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली जाते. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून टोमॅटोंच्या दरामध्ये घसरण होत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये 20 किलो टोमॅटोसाठी 50 रुपयांचा दर दिला जात आहे. त्यामुळे टोमॅटो बाजारपेठेत आणण्याचा खर्चही निघत नसल्याने ते फेकून देण्याची वेळ शेतकऱयांवर आली आहे.
सात महिन्यांपूर्वी 800 रुपयात विकले जाणार्या टोमॅटोच्या कॅरेटला सध्या केवळ 40 ते 50 रुपयात विकले जात आहे. योग्य भाव नसल्याने तो आवारातच फेकण्यात येत आहे. मागील उन्हाळा व सात महिन्यांपूर्वी टोमॅटोला चांगला भाव मिळत होता, हे भाव कायम राहून नव्याने टोमॅटोची लागवड करणार्या शेतकर्यांना भरघोस उत्पन्न मिळेल, या आशेवर जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्यांनी टोमॅटोची लागवड केली. परंतु शेतकर्यांचा अंदाज खोटा ठरू लागला आहे.
दरम्यान, नंदुरबार बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या टोमॅटोला अपेक्षित भाव मिळत नसल्याने मार्केट आवारातच तो फेकला जात आहे. शेतकर्यांनी मोठ्या आशेवर टोमॅटोची लागवड केली. परंतु, योग्य भाव मिळत नसल्यामुळे ते परत घरी नेण्याचा खर्च वाचवण्यासाठी मार्केटमध्येच फेकून दिले आहेत.