ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यात यंदा नवरात्रीतील सर्व कार्यक्रम रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

कोरोनाचा हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील 17 पैकी 8 सार्वजनिक गरबा मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी यंदाचा गरबा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे खोडाईदेवीच्या पूजार्‍यांनीदेखील प्रतिसाद देत यात्रा रद्द करण्याची हमी दिली आहे. रावण दहनाचे आयोजक ईश्वर चौधरी यांनीही विजयादशमीच्या दिवशी होणारा रावण दहन कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय पोलिसांना कळविला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्‍यांनी देखील पथसंचलन न करण्याचा निर्णय दिला आहे.

यंदा नवरात्रीतील सर्व कार्यक्रम रद्द
यंदा नवरात्रीतील सर्व कार्यक्रम रद्द
author img

By

Published : Oct 4, 2020, 10:34 AM IST

नंदुरबार- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच सण उत्सव तोंडावर आले आहेत. मात्र, कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेता यंदाच्या नवरात्रोत्सवात खोडाईमाता यात्रा, दांडीया, रावण दहन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन या सारखे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमाळकर यांनी याबाबतची माहिती दिली.

गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार शहरातही दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्याची परंपरा आहे. या दरम्यान ठिकठिकाणी दांडीया नृत्य खेळले जाते. त्याचप्रमाणे नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून ते दसऱ्यापर्यंत खोडाईमातेची यात्रा भरते. नवरात्र काळात पहाटेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत खोडाईमातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविकांची उपस्थिती राहते. यात्रेला जिल्हाभरातून नागरिक दर्शनासाठी येत असतात, दसर्‍याच्या दिवशी साक्रीनाका परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रावण दहनाचा कार्यक्रम होतो. त्याठिकाणीदेखील मोठ्या संख्येने नागरिक रावण दहन पाहण्यासाठी येत असतात. त्याचप्रमाणे विजया दशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरात पथसंचलन केले जाते. पथसंचलनात मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक सहभागी होत असतात.

यंदा नवरात्रीतील सर्व कार्यक्रम रद्द

यंदाच्या वर्षी मार्च महिन्यापासूनच सर्व धार्मिक स्थळे मंदिरे, यात्रा, जत्रा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, राज्यात अनलॉक सुरू होत असल्याने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरे उघडण्याची मागणी काही ठिकाणाहून केली जात आहे. मात्र, कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही. त्यामुळे नदुंरबारमध्ये नवरात्री काळात होणाऱ्या कार्यक्रमाबाबत आयोजकांची बैठक पोलीस ठाण्यात बोलविण्यात आली होती. त्यावेळी कोरोना या महामारी संकटाचे गांभीर्य पोलीस निरीक्षक रवींद्र कळमाळकर यांनी सर्व आयोजकांना समजावून सांगितले. कोरोनाचा हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील 17 पैकी 8 सार्वजनिक गरबा मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी यंदाचा गरबा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचप्रमाणे खोडाईदेवीच्या पूजार्‍यांनीदेखील प्रतिसाद देत यात्रा रद्द करण्याची हमी दिली आहे. रावण दहनाचे आयोजक ईश्वर चौधरी यांनीही विजयादशमीच्या दिवशी होणारा रावण दहन कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय पोलिसांना कळविला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्‍यांनी देखील पथसंचलन न करण्याचा निर्णय दिला आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुर्गादौड काढली जाते. याबाबत पदाधिकार्‍यांशी चर्चा करून त्याचा निर्णय पोलिस प्रशासनास कळविला जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमाळकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.